बारवर पोलिसांची धाड, सव्वाचार लाखांची दारू जप्त

वणीतील सुपरिचित बारवर मध्यरात्री पोलिसांची धाड

0

जब्बार चीनी, वणी: वणीतील एका सुपरिचत बारमध्ये धाड टाकून पोलिसांनी सुमारे चव्वा चार लाखांची दारू जप्त केली आहे. गुरुवारी  रात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी बार मालकासह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. एसडीपीओ वणी यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली. संचारबंदीच्या काळातली ही सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईत सुमारे 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वणीत यवतमाळ रोडवर अक्षरा हे बार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांना गुरूवारी रात्री 12 च्या सुमारास खब-याकडून या बारमधून दारूचा अवैधरित्या सप्लाय होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी त्यांच्या टीमसह घटनास्थळी भेट दिली असता अक्षरा बारच्या मागील बाजूस असलेल्या सुगम हॉस्पीटल लगत एका बांधकाम सुरू असलेल्या जागेत ईकोस्पोर्ट फोर्ड कार (एमएच 29-BC 5003) हे वाहन उभे दिसले. तसेच त्या कारजवळ चार इसम उभे असलेले दिसले.

त्या कारची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये विदेशी दारू ठेवलेली दिसली. तिथे उभे असलेल्या इसमांची चौकशी केली असता त्यांना ही दारू अक्षरा बारमधली असून संचारबंदीत विक्रीसाठी ही दारू वापरली जात असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी लगेच कारवाई करत वाहनातून एकून 1 लाख 17 हजार 600 रुपयांची दारू जप्त केली.  तसेच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून एकून 2 लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत एकून 4 लाख 23 हजार रूपयांची विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली. यात विस्की, बियर, रम, व्होडका यासह उच्च प्रतीच्या स्कॉच दारूंचा समावेश आहे. यासह इमारती समोर वाहतुकीकरता वापरण्यात येणारी इकोफोर्ट कार, होन्डा ऍक्टिवा (एमएच 29 ए एफ – 8910) मोपेड तसेच विदेशी दारू असा एकून 14 लाख 73 हजारांचा माल पोलिसांनी जप्त केला.

सदर ठिकाणी दारू बाळगणारे/वाहतुक करणारे बार मालक प्रवीण गुलाबराव सरोदे वय 41 वर्ष रा साधनकरवाडी वणी, नंदकिशोर उर्फ बादशाह शामराव रासेकर वय 36 वर्ष व्यवसाय शेती रा. प्रगती नगर वणी, भारत अंबादास सावंत वय 27 वर्ष व्यवसाय अक्षराबार वेटर रा. लोणी ता आर्णी जि यवतमाळ ह. मु अक्षराबार वणी, सुहास मारोतराव टेंभरे वय 33 वर्ष व्यवसाय अक्षराबार वेटर रा. सालोड हिरापुर वर्धा ह. मु. अक्षरा हॉटेल वणी यांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींच्या विरोधात कलम 65 (अ), 65 (ई) महाराष्ट् दारूबंदी अधिनियम सहकलम 109, 188 भादंवि सहकलम, 51 (ब) राष्ट्रीय व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांच्या नेतृत्वात, पोलीस उपअधिक्षक नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ना पो.कॉ. विजय वानखेडे, इक्बाल शेख, प्रदीप ठाकरे, रवींद्र इसनकर, आशिष टेकाडे, संतोष कालवेलवार, अतुल पायघन, अशोक दरेकर यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!