कुख्यात रेती तस्कराला अटक कधी होणार ?

अंतरिम जामीन रद्द होऊन उलटला आठवडा

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील रेती तस्कराची जामीन अर्ज खारीज होऊन आठ दिवस उलटूनही आरोपी अटकेपासून दूर असल्यामुळे आरोपीला अटक होणार की नाही ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. गेल्या काही घटनांमध्ये चोरट्यांना अवघ्या दोन तासात अटक करणा-या वणी पोलिसांवर रेती तस्कर भारी पडताना दिसत आहे. सदर प्रकरणात पोलीस विभागाची भूमिका सुरुवातीपासून संशयाच्या भोवऱ्यात आहे. आरोपीची राजकीय क्षेत्रात वरपोच असल्यामुळे त्याला अटक न करण्याचा पोलिसांवर दबाव असल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर वृत्त असे की, विना परवाना रेती भरलेले वाहन पकडल्यानंतर गणेशपूरचे मंडळ अधिकारी व तलाठी यांना धमकी देऊन बळजबरीने रेती खाली करून वाहन पळवून नेल्या प्रकरणी आरोपी रेती माफिया उमेश पोद्दारवर 21 मे 2020 रोजी वणी पोलीस ठाण्यात कलम 353, 506 व 34 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणी पोलिसांनी ट्रक जप्त करून चालकाला अटक केले. परंतु गुन्हा दाखल होताच मुख्य आरोपी रेती तस्कर उमेश पोद्दार रा. वणी हा फरार झाला होता. लॉकडाउन बंदोबस्त तसेच वणी येथील मोमीनपूरा भागात दोन गटात हाणामारीची घटनामुळे पोलिसांना आरोपी शोधण्याचा वेळ मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.

संग्रहित फोटो

पोलिसांच्या व्यस्ततेचा फायदा घेऊन आरोपीने दि. 28 मे रोजी पांढरकवडा सत्र न्यायालयातून अंतरिम जामीन मिळविला. अंतरिम जामीनाची मुद्दत 10 जून रोजी संपुष्टात आल्यानंतर आरोपीने पुन्हा जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज टाकला. मात्र सत्र न्यायालयाने आरोपी उमेश पोद्दारचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्या अनुषंगाने पोलिसांना आरोपीला तात्काळ अटक करणे अपेक्षित होते. परंतु जामीन अर्ज खारीज होऊन आठ दिवस उलटले असता आरोपी पोलिसांना मिळून आला नाही.

चोरट्यांना दोन तासात अटक, रेती तस्कर मोकाट…
दारू तस्कर व चोरट्याना काही तासातच अटक करणाऱ्या वणी पोलिसांना शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा 25 दिवसानंतरही थांगपत्ता लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
माहितीनुसार आरोपी रेती तस्कराचे काही राजकीय नेत्यांसोबत मधुर संबंध असल्यामुळे आरोपीला अटक न करण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याची जोरदार चर्चा जनतेत सुरू आहे. तर दुसरीकडे आम्ही आरोपीला अटक करणारच ! असा दावा पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.