बाप लेकीचे एकाच वेळी रक्तदान..

वणी येथील रक्तदान शिबिरात 347 व्यक्तींचे रक्तदान

0

जब्बार चीनी, वणी: कोविड- 19 च्या संकटात खालावलेला रक्तपुरवठा भरून काढण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे वतीने पूर्ण जिल्ह्यात दि. 14 जूनला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने वणी नगर परिषदेचे अध्यक्ष तथा भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांनी व नागरिकांनी रक्तदान करावे यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वणीतील कल्याण मंडपम येथे आयोजित या शिबिराचे उदघाटन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दीप प्रज्वलन करून केले. या प्रसंगी भाजपाचे विजय पिदूरकर, दिनकर पावडे, पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे प्रामुख्याने उपस्थित होते.

भारतीय जनता युवा मोर्चा वणी विधानसभा द्वारा
आयोजित रक्तदान शिबीरात या परिसरातील 347 युवकांनी
रक्तदान केले आहे. आत्तापर्यंत झालेल्या रक्तदान
शिबिरापैकी या शिबिरात सर्वाधिक रक्तदात्यांनी
रक्तदानाचा उच्चांक गाठला आहे. शिबिरासाठी नागपूर
येथील लाईफ लाईन ब्लड बँकेची चमूने रक्त गोळा केले आहे.

 

वडील आणि मुलीने केले रक्तदान
नुकतेच 18 वर्ष पूर्ण केलेली कु. चिकिता रविंद्र बोम्मावार हिने आपले वडील रविद्र बोम्मावार यांच्यासोबत रक्तदान केले. चिकिताची रक्तदानाची पहिलीच वेळ होती. तर तिच्या वडिलांची ही सहावी वेळ आहे. प्रत्येकांनी रक्तदान करून आपल्या पाल्यालाही रक्तदानाचे महत्व पटवून द्यावे असे मत यावेळी व्यक्त केले. उपस्थित असलेल्या मान्यवरांनीही या बापलेकींचे कौतुक केले.

या रक्तदान शिबिरासाठी भाजयुमोचे वैभव कौरासे, सुमित चोरडिया भाजपाच्या नगरसेविका ममता अवताडे, स्वाती खरवडे, अक्षता चव्हाण, प्रीती बिडकर, मनिष गायकवाड, निखिल खाडे, सुभाष वाघळकर, गुंजन इंगोले, निलेश होले, निलेश झाडे यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.