Browsing Tag

Lead Story

गर्भवती नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परसोडा येथील एका 21 वर्षीय गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पायल गौरव उरकुडे असे मृत महिलेचे नाव…

वणीत विदर्भवाद्यांतर्फे आंदोलन, नागपूर कराराची होळी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने शनिवारी नागपूर कराराची होळी करत राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. शहरातील छ. शिवाजी महाराज चौकात दुपारी हे आंदोलन झाले. राज्य निर्मितीसाठी आवश्यक…

कुलरचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पुनवट येथील एका २१ वर्षीय युवकाचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. तुषार श्यामराव मडावी असे…

वणी काँग्रेसला की शिवसेनेला? ‘या’ तारखेनंतर सुटणार तिढा

निकेश जिलठे, वणी: जसजशी निवडणूक जवळ येत आहे. तसतशी उमेदवारांची, मतदारांची उत्कंठा शिगेला पोहचत आहे. त्यातच वणी विधानसभेची जागा शिवसेनेला की काँग्रेसला जाणार? याची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे. 1990 पासून सलग तीन टर्म व 2009 चा विजय…

बाहेरगावचा पाहुणा वणीत आला, दीपक टॉकीजजवळ दोघांनी लुटले

विवेक तोटेवार, वणी: पाहुणचारासाठी आलेल्या एका पाहुण्याला दोन लुटारुंनी लुटले. त्यांनी मोबाईल व रोख लुटून घटनास्थळावरून पळ काढला. सोमवार 23 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास जत्रा रोडवरील एका बार समोर घडली. याबाबत तरुणाने तक्रार दाखल…

लाखापूर येथे राजू उंबरकर यांच्या तर्फे स्वखर्चाने रस्त्याचे काम

बहुगुणी डेस्क, वणी: लाखापूर तालुका मारेगाव येथील जनतेच्या हिताचा विचार करत, राजू उंबरकर यांनी आपल्या पुढाकाराने आणि स्वखर्चातून पाणंद रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतक-यांची होणारी गैरसोय थांबणार आहे. स्वखर्चातून…

मारेगाव येथील महाआरोग्य शिबिराला 1600 रुग्णांची तपासणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: काँग्रेसतर्फे मारेगाव येथील लोढा हॉस्पिटल येथे पार पडलेल्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सुमारे 1600 रुग्णांनी या शिबिरात तपासणी केली. शनिवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी दु. 1 ते 5 या वेळेत…

चोरट्यांनी चोरली पोकलँड मशिनची बॅटरी, टूलकीट

बहुगुणी डेस्क, वणी: एका कारखान्या समोर असलेल्या रोडच्या कामासाठी लावलेल्या पोकलँड मशिनमधून चोरट्यांनी बॅटरी, टूलकीट चोरून नेली. चोरटे इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी मशिनमधले डिझेल देखील चोरून नेले. 17 सप्टेंबर रोजी रात्री पावने 11 च्या…

चोरट्याने लंपास केली बचतगटाची रक्कम व सोन्याचे दागिने

बहुगुणी डेस्क, वणी: घरी कपाटात ठेवलेले दागिने व बचत गटाचे पैसे अज्ञात चोरट्याने चोरून नेले. गेडाम ले आऊट येथे ही घटना घडली. रविवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चोरट्याने सुमारे 60 हजारांचा डल्ला मारला आहे.…

तालुक्यात खड्डेमय रस्ते, कधी उघडणार बांधकाम विभागाचे डोळे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ओव्हरलोड वाहतुकीमुळे तालुक्यातील अनेक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यात मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात देखील होत आहेत. याबाबत काँग्रेसचे जिल्हा…