मासिक इंस्टॉलमेंटमध्ये लॅपटॉप, सीसीटीव्ही घेण्याची संधी

साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये विद्यार्थी, सर्वसामान्यांसाठी नवीन ऑफर

0

वणी: वणीतील खाती चौक इथं असलेल्या साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये विविध ग्राहकांसाठी विविध ऑफर सुरू करण्यात आल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ग्राहकांना मासिक इंस्टॉलमेंटमध्ये लॅपटॉप आणि कॉम्प्युटर उपलब्ध करून दिला जाणार आहे. सोबतच लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर 5 ते 10 टक्क्यांची सुट दिली जाणार आहे. यात विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के तर इतरांसाठी 5 टक्क्याची सुट असणार आहे. ही सुट केवळ 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून एचपी, डेल, लेनोव्हो, एसर, असूस, इत्यादी कंपनींच्या लॅपटॉपवर ही सुट देण्यात आली आहे.

आज प्रत्येक व्यक्तीला कॉम्प्युटर आणि लॅपटॉपची गरज असते. त्यातच अनेकांचे फिरस्ती काम असते. अशांना कामासाठी लॅपटॉपची नितांत गरज असते. मात्र लॅपटॉपच्या किंमती या कॉम्प्युटरपेक्षा अधिक असल्याने प्रत्येकांनाच लॅपटॉप विकत घेणे आवाक्यात नसते. त्यामुळे खाती चौकातील साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीने ग्राहकांसाठी मासिक इंस्टॉलमेंटवर लॅपटॉप आणि कॉम्प्युटर उपलब्ध दिले आहे.

सध्या ऑफिस आणि व्यापारी प्रतिष्ठानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचं होऊन गेले आहे. मात्र त्याचाही भाव अधिक असल्याने अनेक छोटे व्यावसायिक सीसीटीव्ही बसवण्याच्या विचार करत नाही. अशा छोट्या व्यावसायिकांसाठी साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीने वाजवी दरात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून दिले आहेत. यात 4 कॅमे-याचा सेटअप केवळ 4990 मध्ये उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच 8 आणि 16 कॅमेराचा सेट देखील उपलब्ध आहे.

महत्त्वाचं म्हणजे सीसीटीव्हीचे सेटअप अत्याधुनिक असून त्याचे मॉनिटरिंगसाठी तुम्हाला कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर बसून राहण्याची गरज नाही. कॅमे-याचे मॉनिटरिंग तुम्हाला मोबाईलवर देखील करता येणार आहे. त्यामुळे सीसीटीव्हीसाठी कॉम्प्युटर स्क्रिनसमोर बसून राहण्याची अडचण दूर होणार आहे. सोबतच ग्राहकांना सीसीटीव्हीचा फ्रि डेमो दाखवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. यासाठी फोन करून संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या नवीन स्किमबाबत वणी बहुगुणीशी बोलताना साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीचे संचालक कुणाल वासेकर म्हणाले की…

सध्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप हे अत्यावश्यक वस्तू झाली आहे. पण विद्यार्थ्यांना लॅपटॉप घेणे सहज शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी मासिक इस्टॉलमेंटमध्ये लॅपटॉप घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरी हे वणीतील एकमेव दुकान आहे जिथे लॅपटॉप आणि सीसीटीव्हीवर सुट देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी 10 टक्क्यांची सुट देण्यात आली असून इतरांसाठी ही सुट पाच टक्के आहे. ही स्किम केवळ 31 डिसेंबर पर्यंत असून ग्राहकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा.

साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरी
पत्ता: खाती चौक, विराणी मॅरेज हॉल रोड, वणी
संपर्क: कुणाल वासेकर – 9823687568

Leave A Reply

Your email address will not be published.