विवेक तोटेवार, वणी: सोमवार 12 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टी वणी व भाजपा महिला मोर्चा वणीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करून आक्रोश आंदोलन करण्यात आले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार ह्यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन झाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात राज्यातील विविध भागांत बालिकेपासून महिला, माता- भगिनींवर होत असलेल्या अन्याय ,अत्याचार विरोधात निदर्शने करण्यात आलीत. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. कोवीड रुग्णालयातसुध्दा महिला अत्याचाराच्या शिकार होत असून महिलांचे जीवन असुरक्षित आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा प्रशासन व सरकार वर वचक नसल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. सरकारला जाग आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यव्यापी आक्रोश आंदोलन करून ठाकरे सरकारला जाब विचारण्यात आला. सोमवार 12 ऑक्टोबर रोजी वणीतीळ टिळक चौकमध्ये याबाबत निदर्शने करण्यात आलीत. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून महिला अत्याचाराबाबत तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, किशोर बावणे, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे, मंगला पावडे, संध्या अवताडे, आरती वांढरे, जयमाला दर्वे, माया ढुरके, अल्का जाधव, अरुणा जाधव, संतोष डंभारे, कैलाश पिपराडे, नितीन चाहणकर, सुभाष वागडकर, विजय मेश्राम, अरुण कावडकर, संजय झाडे, प्रमोद क्षीरसागर, शुभम गोरे, आशीष डंभारे, पंकज कासावार, अक्षय नायगावकर, तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.