कर्णधार मोन्टीची चौकार षटकारांची बरसात… अवघ्या 25 बॉलमध्ये कुटल्या 62 धावा

टायगर रोअरिंगची विजयी सलामी... रेनबो क्लब व आमेर नाईट रायडरचा एकतर्फी विजय... अशी आहे गुणतालिका...

विवेक तोटेवार, वणी: प्रेक्षकांचा उत्साह शिगेला… चौकार, षटकाराची बरसात… तुफानी फलंदाजीने प्रेक्षकांचा एकच जल्लोष… आजचा दिवस गाजवला तो रेनबो संघाचे कर्णधार मोन्टी धडाकेबाज बॅटिंगने…. चौकार, षटकाराची बरसात करत त्याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले व 25 चेंडूत 62 रन्सची धडाकेबाज खेळी करत त्यांच्या टीमला विजय मिळवून दिला. गुरुवारी एकूण 5 सामने होते. मात्र त्यातील दोन सामने पावसामुळे रद्द झाले.

उदघाटन नंतर प्रथम सामना हा टायगर रोअरिंग विरुद्ध श्री राम वारीअर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात टायगर रोअरिंग यांनी नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करीत टायगर रोअरिंग संघाने 10 षटकात 7 फलंदाज गमावून 113 धावा केल्या. स्वप्निल याने 11 बॉलमध्ये 30 धावा कुटल्या. 114 रन्सचा पाठलाग करताना श्रीराम संघाला 9 फलंदाज बाद 73 धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना टायगर रोअरिंग संघाने 40 धावांनी जिंकला. एकतर्फी झालेल्या या सामन्याचा सामनावीर स्वप्नील ठरला.

दुसरा सामना हा रेनबो संघ विरुद्ध छत्रपती वारीअर्स यांच्यात खेळल्या गेला. रेनबो संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. त्यांनी 10 षटकात 5 फलंदाज बाद 108 धावा केल्या. यात कर्णधार मोन्टी याने धडाकेबाज अर्धशतक करत 5 चौकार व 4 षटकारासह 62 रन्सची तुफानी खेळी खेळली. या 109 धावसंख्येचा पाठलाग करीत छत्रपती संघाला 8 फलंदाज गमावून 98 धावांपर्यत मजल मारता आली. हा सामना रेनबो संघाने 10 धावांनी जिंकला.

तिसरा सामना हा माऊली मराठा संघ विरुद्ध आमेर नाईट रायडर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आमेर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. माऊली संघाला 87 धावांचा समाधान कारक स्कोअर केला. तर आमेर संघाने 88 धावांचे लक्ष अवघ्या 6 षटकात 4 गडी बाद करत सहजपणे गाठले. या सामन्याचा सामनावीर आमेर संघाचा संदीप मांढरे हा ठरला. त्याने दोन षटकात 13 धावा देत 3 फलंदाज बाद केले.

चौथा सामना राजपूत रॉयल्स व जन्नत 11 यांच्यात खेळला गेला. राजपूत रॉयल्स यांनी प्रथम फलंदाज करीत 8 गडी गमावून 78 धावा केल्या. तर जन्नत 11 ला पावसामुळे फलंदाजी करता आली नाही. या दोन्ही संघाला प्रत्येकी 1, 1 गुण देण्यात आला. पाचवा सामना हा एम ब्लास्टर विरुद्ध जय महाकाली संघात होणार होता. परंतु पावसमुळे हा सामना रद्द झाला या दोन्ही संघाला प्रत्येकी 1 गुण देण्यात आला.

आजचे सामने
1) आमेर नाईट रायडर विरुद्ध एम ब्लास्टर – स. 10 वाजता
2) रेनबो क्रिकेट क्लब विरुद्ध जय महाकाली – दु. 12.30 वा.
3) 11 टायगर रोअरिंग विरुद्ध छत्रपती वारीअर्स – दु. 3 वा.
4) जन्नत 11 विरुद्ध माऊली मराठा – संं. 5.30 वाजता
5) राजपूत रॉयल्स विरुद्ध श्री राम वारीअर्स – रा. 8 वाजता

अशी आहे गुणतालिका…
1) आमेर नाईट रायडर -2
2) रेनबो क्रिकेट क्लब – 2
3)11 टायगर रोअरिंग -2
4) एम ब्लास्टर -1
5) जय महाकाली -1
6) राजपूत रॉयल्स -1
7) जन्नत 11 -1
8) माऊली मराठा – 0
9) छत्रपती वारीअर्स – 0
10) श्री राम वारीअर्स – 0

क्रिकेट मॅच लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा.. ]

हे देखील वाचा: 

भावपूर्ण वातावरणात वणीकरांनी घेतले वीर सुपुत्राचे अंत्यदर्शन…

वणीमध्ये सेनेची मुहुर्तमेढ करणारे शिंदे गटाला देणार उभारी ?

 

Comments are closed.