Lodha Hospital

यवतमाळ येथील संपाचा फटका वणी तालुक्याला

कोविड केअर सेंटरमध्ये टेस्टसाठी स्वॅब घेणे बंद

0

जब्बार चीनी, वणी: यवतमाळ येथे सध्या डॉक्टरांचा आणि कर्मचा-यांचा संप सुरु आहे. जिल्हाधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत डॉक्टर आणि कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्याचा फटका वणीतील कोरोनाच्या कामाला बसला असून दिनांक 30 सप्टेंबर व आज 1 ऑक्टोबर रोजी एकही स्वॅब टेस्ट साठी पाठवण्यात आलेले नाही. त्यामुळे कालसारखी आजही कोरोनाची रुग्णसंख्या शुण्य आहे. सध्या तालुक्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 647 एवढी आहे.

आज यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले 20 अहवाल प्राप्त झाले. यात कुणीही पॉजिटिव्ह आढळून आलेले नाही. तसेच यवतमाळला संप सुरू असल्याने आज कोणत्याही संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले नाही. अद्याप 33 अहवाल येणे बाकी आहे.

Sagar Katpis

आज 20 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 20 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात एकूण 647 पॉजिटिव्ह रुग्ण आहेत. यातील 563 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 67 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 10 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 57 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 20 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 12 व्यक्ती भरती आहेत.

यवतमाळच्या संपाचा फटका वणीलाही
यवतमाळ येथे जिल्हाधिकारी यांच्या बदलीची मागणी डॉक्टरांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला काही कर्मचा-यांच्या संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याचा फटका जिल्ह्यातील सर्वच कोविड केअर सेंटरला बसला आहे. डॉक्टर आणि कर्मचा-यांचा संप असल्याने सध्या स्वॅब घेणे बंद आहे. त्यामुळे आज ना रॅपिड ऍन्टीजन टेस्ट घेण्यात आली ना आरटीपीसीआर साठी स्वॅब घेण्यात आली. या संपाचा फटका परिसरातील संशयीत रुग्णांना बसू शकतो.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!