मारेगावमध्ये आज आणखी 5 रुग्ण

कुंभा व टाकळी येथे कोरोचा शिरकाव

0

नागेश रायपुरे, मारेगाव: काल तालुक्यात 6 रुग्ण आढळल्यानंतर आज शुक्रवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी तालुक्यात आणखी 5 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 3 रुग्ण हे मारेगाव तर कुंभा व टाकळी येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 13 झाली आहे. आज आलेले रुग्ण हे पंचायत समिती कर्मचा-यांच्या संपर्कातील असल्याची माहिती आहे.

आज 44 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. यात 5 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 39 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. पॉजिटिव्ह व्यक्तींमध्ये माधव नगरी येथील 2, इंदिरा नगर येथील 1 तर टाकळी व कुंभा प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. कुंभा येथील व्यक्ती ही आरोग्य विभागात कार्यरत असलेली असल्याने चिंता वाढली आहे. काल आलेल्या रुग्णांमुळे प्रभाग क्रमांक 6 व करणवाडीतील काही परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर करून हा परिसर सिल करण्यात आला.

राजूर येथील रुग्णाच्या संपर्कात आल्याने कुंभा येथील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आली होती. त्यानंतर तालुक्यातील कोरोनाची साखळी खंडीत झाली होती. मात्र त्यानंतर सुमारे महिनाभरानंतर 3 सप्टेंबर रोजी मारेगाव पंचायत समितीतील एक कर्मचारी व सिंदी येथील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आली होती.

काल गुरुवारी कोरोनाने अचानक सिक्सर मारला. यात वणी येथील वास्तव्यास असलेली व मारेगाव येथे व्यवसाय असलेल्या एक व्यक्तीसह आणखी 3 रुग्ण मारेगावात आढळले तर 2 रुग्ण करणवाडी येथे आढळले होते.

कोरोनाची साखळी खंडीत झाली असताना अचानक तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे शिवाय नागरिकांमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.