बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील एक कॉलेजमध्ये 11 व्या वर्गात असलेली एक मुलगी घरून निघून गेली. या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या एका गावात ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी ही 16 वर्ष 11 महिन्याची आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी ही एका कॉलेजमध्ये 11 व्या वर्गात शिक्षण घेते. ती तिच्या मामा कडे राहते. तिचे मामा मजुरीचे काम करतात. गुरुवारी दिनांक 5 डिसेंबर रोजी तिच्या मामाला सुट्टी असल्याने ते घरीच होते. सकाळी कॉलेजच्या वेळी त्यांची भाची बॅग घेऊन घरून कॉलेजला निघून गेली. मात्र रात्र झाली तरी ती घरी परतली नाही.
रात्री तिच्या मामाने तिच्या मोबाईलवर कॉल केला. तेव्हा ती कॉल रिसिव्ह करीत नव्हती. काही वेळाने तिचा मोबाईल स्विच्ड ऑफ झाला. मुलीच्या मामाने तिचा आजुबाजुच्या गावात शोध घेतला. मात्र ती आढळून आला नाही. तसेच तिच्या मैत्रिणीला विचारपूस केली असता ती कुणाच्याच घरी नसल्याचे आढळून आले.
अखेर दुस-या दिवशी मुलीच्या मामाने शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964
छपाईच्या वादातून दोन कुटुंबामध्ये राडा, सळाख व फावड्याने मारहाण
Comments are closed.