जिणेशा लोढा 10 वीत तर ओम आकुलवार 12 वीत तालुक्यात प्रथम

आर्या कुमरवार 10 वीत द्वितीय, सुशगंगातून कृष्ण आर बीजवे प्रथम

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी दिनांक 13 मे रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा (सीबीएसई) निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यामध्ये स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचा 12 वीचा ओम मनोज आकुलवार 94.40% तर 10 वीत याच शाळेतील जिणेशा महेंद्र लोढा 97.40% घेऊन तालुक्यातून प्रथम आली आहे. आर्या शिरीष कुमरवार ही 96.40% द्वितीय तर सानवी राम बलकी 95.40% ही तृतिय आली आहे. तर सुशगंगा विद्यालयातील कृष्ण आर बीजवे हा 94.4% गुण घेऊन शाळेतून प्रथम आला आहे. 12 वीत वेदिका शंकर झिलपे ही 92.2% गुण घेऊन द्वितीय तर अरफा अन्सार चिनी 87% गुण मिळवत तिसरी आली आहे.

स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 10 वीत कृष्ण आर बीजवे 94.4%घेऊन प्रथम आला आहे. हनिया इकबाल खान हि 85.8% घेऊन शाळेतून द्वितीय आली आहे, हनिया खान 85.8, श्रावणी बोंगिरवार 84.04, तसनिम खान 84.04, अनुप ऐकरे 83.04 गुण मिळवत पहिल्या 5 मध्ये येण्याचा बहुमान मिळवला. तर अदा पटेल हिला 81 टक्के गुण मिळाले आहे. संस्थाध्यक्ष प्रदीप बोनगिरवार, व्यवस्थापकीय संचालक मोहन बोनगिरवार व प्राचार्य प्रवीणकुमार दुबे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.

मॅकरून स्टुडंट अकॅडमीने आपल्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या शाळेतून 10 वित सनया महेंद्र कठाने 89%, द्वितीय विजेता विश्वास शेळकी 88% तर तनिशा शैलेंद्र लाल हिने 87% गुण घेऊन शाळेतून तृतीय आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.