ग्रामीण भागात अवैध दारूचा महापूर, सराटीतून देशी दारूचे 14 बॉक्स जप्त

घरातून देशी दारुच्या 672 नीप जप्त, एलसीबीची कारवाई

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मारेगाव तालुक्यातील सराटी येथील एका घरून तब्बल 672 बॉटल अवैध देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेतर्फे ही कारवाई करण्यात आली. अवैधरित्या विकण्यासाठी हा दारूसाठा करण्यात आला होता. या कारवाईत एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

Podar School 2025

गुरुवारी दिनांक 14 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी)चे पथक पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान पथकाला खबरीद्वारा मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम सराटी येथे राहणारा विवेक नरांजे याने त्याच्या घरात दारुचा मोठ्या प्रमाणात अवैधरित्या साठा केल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून एलसीबीचे पथक पंचासह ग्राम सराटी येथे विवेक नरहरी नरांजे (39) याच्या घरी गेले. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्याच्या घराची झडती घेतली असता घरातील स्वयंपाक खोलीच्या बाजूला असलेल्या एका खोलीत देशी दारुचे तब्बल 14 बॉक्स आढळून आले. यात 180 एमएल क्षमतेच्या देशी दारुच्या एकूण 672 बॉटल ज्याची किंमत 46704 रुपये असा साठा आढळून आला. पथकाने घटनेचा पंचनामा करून आरोपी विवेक नरांजे विरोधात मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये गुन्हा दाखल केला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, आधासिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, पोलीस अमंलदार सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, रजनिकांत मडावी, सतिश फुके, सर्व स्थानिक गुन्हे शाखा व रजनिकांत पाटील, राजू टेकाम, पोस्टे मारेगाव यांनी पार पाडली.

Comments are closed.