सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलिस स्टेशन अंतर्गत पायदळ व चारचाकी वाहनाने जनावरांची तेलंगणात तस्करी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले आहे. अश्या पोलीस स्टेशनचा पदभार महिला ठाणेदारांना देण्यात आला आहे. ३१ मार्च च्या मध्यरात्री पाटणबोरी ते आदीलाबाद माथार्जुन मार्गाने तेलंगणात कत्तली करिता अवैधरित्या जनावरे घेऊन जात असल्याची माहिती पाटण पोलिसांना मिळाली. यावरून महिला ठाणेदार संगीता हेलोंडे स्वतः आपला पोलीस ताफा घेऊन वडगाव रोड व माथार्जुन रोडवर पोहचून सापळा रचला. रात्री माथार्जुन मार्गाने पायदळ जनावरे घेऊन दोन व्यक्ती येत होते.
दोघांनाही थांबून विचारपूस केली असता दोघांनीही सदर जनावरे तेलंगणात कत्तली करीत नेट असल्याचे सांगितले. यावरून आरोपी गुडफु उर्फ विनोद रामचंद्र टेकाम वय ३० वर्ष रा माथार्जुन व विलास कवडू आडे वय ४० रा पिवरडोलया दोघांना ताब्यात घेतले. व १६ नग जनावरे किंमत १ लाख ६६ हजाराचा मुद्देमाल जप्त करून ठाण्यात आणला. कत्तली करीता घेऊन जाणारे जनावरांचा मालक पाटणबोरी येथील जुम्मा सेठ नामक व्यक्तीची असल्याचे सांगण्यात आले.
यावरून पोलिसांनी कलम 11(1)(च)(ज)प्राणी छळ प्रतिबंधक कायदा सह क 5,5(अ)5(ब)9महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 119 मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल केला. कत्तली करिता जाणारे १६ नग जनावरे दुर्भा येथील गौरक्षण मध्ये ठेवण्यात आले आहे. तालुक्यातील शिबला, माथार्जुन, पाटण, झरी, खरबडा, पाटणबोरी व इतर काही ठिकाणी जनावर तस्करांची टोळी असून हि टोळी आठवड्यातून तीन दिवस तेलंगणात कत्तली करिता जनावर तस्करी करतात यांना पकडून कार्यवाहि केल्यास जनावर तस्करीवर अंकुश नक्कीच लागेल.
पाटण पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष व आपल्या कामात कुणाचेही हस्तक्षेप सहन न करणारी कडक महिला ठाणेदार आल्याने परिसरातील अवैध धंदे करणारे गायब झाले झाले आहे.महिला ठाणेदार हेलोंडे यांची गाडी बघताच रस्ते खुले होतात तर त्यांनी कार्यवाही सपाटा लावल्याने त्यांची एक वेगळीच छाप निर्माण झाली आहे.
हि कार्यवाही ठाणेदार संगीता हेलोंडे सह पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे, अंकुश दरबस्तेवर,नरेश गोळे,होमगार्ड नरेश कायपलिवर,नंदु कंटाळवर यांना केली . तर तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे हे करीत आहे.
हे देखील वाचा: