रविवारी कोरोनाचे 8 रुग्ण, दोन दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ

तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येने पार केला 700 चा आकडा

0

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 18 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले 5 रुग्ण हे आरटी-पीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. तर 3 रुग्ण रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णांपैकी सुंदर नगर येथे 4 रुग्ण, चिखलगाव येथे तर 1 रुग्ण तर इतर ठिकाणी 3 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण कोरोनाच्या रुग्णसंख्येने 700 चे आकडा पार केला. तालुक्यात कोरोनाचे एकूण 704 रुग्ण झालेत.

आज यवतमाळहून 19 अहवाल प्राप्त झाले. यात 5 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 13 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. तर आज 24 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात 3 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 21 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज 23 जणांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर अद्याप 69 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 37 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 704 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 667 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज कोरोना मुक्त झालेल्या 6 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 37 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

सध्या 19 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 18 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 6 व्यक्तींवर उपचार सुरू आहे.

दोन दिवसात रुग्णसंख्येत वाढ
एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होताना दिसत आहे. रुग्णसंख्या इतकी कमी झाली होती की एका दिवशी एकही रुग्ण पॉजिटिव्ह नसायचा. मात्र गेल्या दोन दिवसात 15 रुग्ण आढळून आलेत. यात शनिवारी 7 तर रविवारी 8 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे पुन्हा एकीकडे रुग्णसंख्या कमी होत आहे असे म्हणतानाच रुग्णसंख्या अचानक वाढत तर नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.