डिजेलची अवैधरित्या विक्री करणा-यावर कारवाई, 2 जणांना अटक
सव्वा 7 लाखांचा मुद्देमाल जप्त, वणी घुग्गुस बायपासवर कारवाई
जितेंद्र कोठारी, वणी: विनापरवाना डीजलची विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. सोमवारी दिनांक 1 नोव्हेबर रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास वणी-घुग्गुस बायपासवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोघांना अटक कऱण्यात आली असून 1200 लीटर डिझलसह सुमारे सव्वा 7 लाख लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहन चालक शंकर किसन जिवतोडे (49) रा. नंदोरी जि. चंद्रपूर व जुगबीर भरतराम पुनीया (37) ट्रान्सपोर्ट मालक रा. चिखलगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर डिजेल पेट्रोल अधिनियमानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, ठाणेदार शाम सोनटक्के यांना वणी-घुग्गुस बायपासवरील टोलनाक्याजवळ अवैधरित्या डिजेलची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे त्यांनी अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी ओंमकार पडोळे यांना घटनास्थळी पाठवले. त्यांना टोलनाक्या जवळ पिवळ्या रंगाच्या एका टँकरमधून अवैधरित्या डिजेलची विक्री होत असताना आढळून आले. आरोपी शंकर किसन जीवतोडे यास ताब्यात घेऊन कागद पत्रांची विचारपूस केली असता त्याचे कडे कोणतेही कागदपत्रे आढळून आले नाही.
दरम्यान त्या ठिकाणी जुगबिर पुनिया हे आले असता त्यांनी सदर टँकर गाडी भाडे तत्वावर घेतली असून भारत पेट्रोलियम पंप नागपूर चंद्रपूर हायवे वरोरा येथून सदर डिजेल विक्री करिता आणले असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांना पंपाबाहेर टँकरमध्ये डिझेल विक्री बाबत काही परवाना आहे काय? असे विचारले असता त्यांच्या कडे कुठलाच परवाना आढळून आला नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने दोघांनाही ताब्यात घेतले
वाहन चालक शंकर किसन जिवतोडे (४९) रा. नंदोरी जि.चंद्रपुर, जुगबीर भरताराम पुनीया (३७) ट्रान्सपोर्ट मालक रा. चिखलगाव कलम ३,७ अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ सह कलम ३,४,६ मोटार स्पिरीट आणि हाय स्पीड डिझेल आर्डर १९९८, २३ अधिनियम १९३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांचेकडून टाटा ४०७ वाहन किंमत ६ लाख व १२०० लिटर डिझेल १ लाख २४ हजार असा एकूण ७ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा.डॉ. दिलीप पाटील-भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा.खंडेराव धरणे अपर -पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा.संजय पुज्जलवार उपविपोअ.वणी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, पुरवठा निरीक्षण ओंमकार पडोळे तहसील कार्यालय यणी, पोउपनि/ शिवाजी टिपुर्णे यांनी केली. पुढील तपास पोउपनि/ शिवाजी टिपुर्णे हे करीत आहे.
हे देखील वाचा:
विठ्ठलदास देवचंदमध्ये दिवाळीच्या सर्वात मोठ्या ऑफरला सुरूवात
Comments are closed.