निवडणूक अपडेट – ‘या’ 4 उमेदवारांचे अर्ज ठरले छाननीत बाद

सध्या 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, 4 तारखेला होणार अंतिम चित्र स्पष्ट

निकेश जिलठे, वणी: आज बुधवारी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. यात 4 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. तांत्रिक व इतर त्रुुटीमुळे देवाराव आत्माराम वाटगुरे, सुनील गणपतराव राउत, रत्नपाल बापूराव कनाके, संतोष उद्धवराव भादीकर यांचे अर्ज बाद ठरले आहेत. हे सर्व अपक्ष उमेदवार होते. छाननीमुळे सध्या 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहे. अर्ज परत घेतल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी तसेच अपक्षांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. त्यामुळे 4 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी कोण निवडणुकीच्या रिंगणात राहणार, हे स्पष्ट होणार आहे. 

यांचे अर्ज ठरले ‘ओके’
अरुणकुमार रामदास खैरे (बसपा), राजू मधुकरराव उंबरकर (मनसे), संजय निळकंठ देरकर (शिवसेना उबाठा), संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार (भाजप), अनिल घनश्याम हेपट (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया), प्रवीण रामाजी आत्राम (राष्ट्रीय गोंडवाना पार्टी), राजेंद्र कवडुजी निमसटकर (वंचित बहुजन आघाडी), यासह अजय पांडुरंग धोबे, आसिम हुसैन मंजूर हुसैन, केतन नत्थुजी पारखी, संजय रामचंद्र खाडे, नारायण शाहु गोडे, हरिष दिगांबर पाते, यशवंत शिवराम बोंडे, निखिल धर्मा ढुरके, राहुल नारायण आत्राम यांचा उमेदवारी अर्ज मंजूर झाला आहे. 

 

अनेक पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांची बंडखोरी
काँग्रेसचे संजय खाडे, एमआयएमचे आसिम हुसैन मंजूर हुसैन, वंचित बहुजन आघाडीचे हरिष पाते, आपचे निखिल धर्मा ढुरके यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. गेल्या वेळी बसपाकडून निवडणूक लढलेले संतोष उद्धवराव भादीकर यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचा अर्ज छाननी बाद ठरला. 4 तारखेपर्यंंत बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्याचे कार्य सुरु राहणार आहे. 

Comments are closed.