ब्राह्मणी येथे पोषण पंधरवड्यानिमित्त मार्गदर्शन व आरोग्य जागृती

किशोरवयीन मुली तथा बचत गटातील महिलांची हिमोग्लोबिन तपासणी

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील घोंसा जवळील ब्राह्मणी येथे महाराष्ट्र शासनाचा एक कार्यक्रम झाला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेद अंतर्गत पोषण पंधरवाडा उत्साहात साजरा झाला. यात किशोरवयीन मुली तसेच बचत गटांतील महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे आरोग्य जागृती आणि तपासणी अभियान राबविले जात आहे. FNHW या कार्यक्रमांतर्गत अन्न, पोषण, आहार, आरोग्य, स्वच्छता या विषयांवर भर देण्यात आला. याचा लाभ अनेक किशोरींनी तसेच बचत गटांतील महिलांनी घेतला. यावेळी उमेद कर्मचारी नीलेश सवंत्सरे, प्रवीण कडुकर, मिलमिले, दिनेश लोहकरे, पोले, ANM सुरतीकर, हतवाडे, नगराळे, प्रीती झाडे, दीपा धानोरकर, मनीषा आवारी, नंदा खामनकर व गावातील महिला उपस्थित होत्या.

 

 

Podar School 2025

Comments are closed.