जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 17 जुलै रोजी एक रुग्ण आढळला होता. दोन दिवसाच्या अवधीनंतर आज सोमवारी वणीत आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळेल आहेत. हे रुग्ण देखील दुस-या साखळीतील (पेट्रोल पम्प) असून तेली फैल येथील रहिवाशी आहे. या रुग्णामुळे कोरोनाचे वणीतील रुग्णांची संख्या ही 22 झाली आहे.
आज निष्पन्न झालेले दोन्ही रुग्णांमध्ये एक 13 वर्षीय मुलगी असून दुसरा 10 वर्षीय मुलगा आहे. आज 29 जणांचे सॅम्पल पाठवण्यात आले होते. त्यात 22 निगेटिव्ह आले असून दोघांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. तर 5 रिपोर्ट्स पेन्डिंग आहेत. तेली फैलामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या सारखी वाढत असल्याने तेली फैल हॉट स्पॉट ठरत आहे.