सुशील ओझा, झरी: आदिवासी बहुल तालुक्यात साधारणतः 21 अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. अंगणवाडीतून बालकांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन मिळावे यासाठी तालुक्यातील अंगणवाड्या डिजिटल करण्याचा निर्णय एकात्मिक बालविकास विभाग प्रकल्पाचे सुनीता भगत यांनी हाती घेतला होता. त्यांच्या या कार्याला बळ जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी बोलेनवार यांचं मिळालं. तालुक्यातील अंगणवाडी दुरुस्ती, साहित्य, व इतर काम करीता लागणार निधी वरील पातळीवरून खेचून आणून जिल्हा परिषद सदस्या बोलेनवार यांच्या कार्याने तालुक्यातील अंगणवाड्या डिजिटल झाल्या आहे.
झरी तालुक्यातील आतापर्यंत 21 अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. तर 72 केंद्राला खेळणी, साहित्य पुरविण्यात आली आहेत यामुळे शून्य ते सहा वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास होणार आहेत.
तालुक्यात 106 मोठ्या अंगणवाड्या तर 30 मिनी अंगणवाड्या आहेत तर 136 अंगणवाडी सेविका याचे काम पाहत आहे. तालुक्यातील जुनोनी, चिचघाट, कुंडी, हिवराबारसा, सुसरी, झमकोला, अडकोली आणि येवती अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्याची माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनीता भगत यांनी दिली आहे. या करिता जिल्हा परिषद सदस्या यांची मोठी मेहनत असून त्यांच्याच प्रयत्नाने तालुक्यातील अंगणवाड्या डिजिटल झाले आहे.