वणी तालुक्यात कोरोनाचे शतक, आज 18 पॉजिटिव्ह

परिसरात कोरोनाचा उद्रेक, आज सर्वाधिक रुग्णसंख्येचा रेकॉर्ड ब्रेक

0

जब्बार चीनी, वणी: वणीतील कोरोनाच्या रुग्णसंख्येने आज शतक पार केले आहे. आज तालुक्यात 18 रुग्ण आढळून आले. हा आता पर्यंतचा सर्वाधिक रुग्णाचा रेकॉर्ड आहे. याआधी 30 जुलै रोजी एकाच दिवशी 10 रुग्ण आढळून आले होते. आज आलेल्या रुग्णांमध्ये 15 व्यक्ती या RT- PCR स्वॅब नुसार तर 3 व्यक्ती या रॅपिड ऍन्टिजन टेस्टमध्ये पॉजिटिव्ह आढळून आल्या आहेत.

आज रंगारीपुरा येथे 9 रुग्ण, गणेशपूर (काटोले ले आऊट) येथे 4 रुग्ण, साने गुरूजी नगर येथे 1, सिंधी कॉलनी येथे 2 रुग्ण तर चिंचोली येथे 1 रुग्ण निष्पन्न झाला आहे. यात 11 महिला तर 7 पुरुष पॉझिटिव्ह आलेले आहेत. 18 पैकी 14 पॉजिटिव्ह हे कन्टेन्मेट झोन मधले आहेत.

आज सर्वाधिक 9 रुग्ण रंगारीपुरा येथे आढळून आले आहे. रंगारीपुरा येथे एक अंडा व्यवसायिक पॉजिटिव्ह आढळून आला होता. त्याच्या कुटुंबातील असल्याचे कळत आहे. तर छोरिया टाऊनशिप येथे राहणा-या एका धाबा व्यावसायिकाकडे काम करणा-या व्यक्तीच्या संपर्कातून कोरोनाने सिंधी कॉलनीत शिरकाव केला आहे. सिंधी कॉलनीत 2 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. तर एका पोलीस कर्मचा-याच्या संपर्कातून गणेशपू येथे 4 रुग्ण आढळून आले आहेत. आज साने गुरूजी नगर येथे एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. ही व्यक्ती कोणत्या साखळीतील आहे हे अद्याप कळू शकले नाही.

कोरोनाने पार केली शंभरी
वणीत 20 जून रोजी पहिला रुग्ण वरोरा रोड येथील परिसरात आढळल्यानंतर, पेट्रोल पम्प, साई नगरी येथे रुग्ण आढळून आले होते. यातील वरोरा रोड व साई नगरी येथील साखळी मागेच खंडीत झाली मात्र पेट्रोल पम्प येथील साखळी वाढून या साखळीने तेली फैल येथे चांगलाच धुमाकूळ घातला. सोबतच ही साखळी वाढून थेट घोन्सा पर्यंत गेली. त्यानंतर राजूर, चिखलगाव, छोरिया टाऊनशिप, गणेशपूर, शास्त्रीनगर, रंगारीपुरा व आता गुरुनगर येथे नवीन रुग्ण आढळून ही साखळी वाढत कोरोनाच्या रुग्णाने तब्बल शंभरी पार केली आहे.

आज वणी तालुक्यात एकूण 18 रुग्ण आढळल्याने पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या ही 114 झाली आहे. यातील 59 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात 53 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. यातील कोविड केअर सेंटरमध्ये 47 व्यक्तींवर उपचार सुरु आहेत तर 06 व्यक्तींवर यवतमाळ जीएमसी येथे उपचार सुरू आहे. सध्या तालु्क्यात 15 कन्टेन्मेंट झोन असून यातील 10 शहरी भागात तर 5 ग्रामीण भागात आहेत.

आज 25 स्वॅब टेस्टसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहेत. तर 35 रिपोर्ट प्राप्त झाले. यातील 15 व्यक्ती पॉजिटिव्ह आहेत. अद्यापही 75 स्वॅबचा रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 27 रॅपिड अँटीजण टेस्ट करण्यात आली. यातील 3 रुग्ण व्यक्ती पॉजिटिव्ह आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.