मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत 24 सार्वजनिक गणपतीची स्थापना

4 गावामध्ये एक गाव एक गणपती

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत 62 गावे येत असून यावर्षी 24 गणपती ची स्थापना करण्यात आली आहे तर 4 गावात एक गाव एक गणपतीचा उपक्रम राबविण्यात आला आहे. कोरोनाचा प्रकोप वाढू नये या करिता शासनाने अनेक बंदी घातली आहे. त्यामुळे गणपती सणावरसुद्धा कोरोनाचा सावट आले आहे.

सार्वजनिक गणपती अतिक्रमण किंवा शासकीय जागेवर बसू नये, ढोल ताशे, वाद्य, लाऊडस्पीकर वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. गणपती मंडळाच्या ठिकाणी किंवा विसर्जन करते वेळी गर्दी करण्यात येऊ नये, मास्क सैनिटायझर चा वापर व इतर अनेक गोष्टीवर बंदी घातली आहे. अनेक गावातील गणपती मंडळ शासनाच्या नियमाला पाळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

गणपती बसविण्यापूर्वी ठाणेदार अजित जाधव यांनी शांतता कमिटी ,गणपती मंडळ व पोलीस पाटील यांची बैठक घेऊन सर्व गावातील मंडळांच्या पदाधिकारी व सदस्यांना शासनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले होते. ठाणेदार जाधव यांच्या आवाहनाला गणपती मंडळ सहकार्य करीत आहे. तसेच ज्या गावात गणपतीची स्थापना करण्यात आले त्या ठिकाणी ठाणेदार स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन भेटी देत आहेत.

मुकुटबन येथे 4 सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात असली आहे तर 16 ग्रामीण भागात व परसोडा,साखरा,कोसारा,चिल्लई या चार गावात एक गाव एक गणपती ची स्थापना करण्यात आले. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत 5 बिट असून पाचही बिट मध्ये सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्यात असले आहे. त्यामुळे ठाणेदार जाधव यांनी सर्वच बिट जमादार पोलीस पाटील होमगार्ड यांना सतर्क राहून कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले आहे.

ठाणेदार अजित जाधव यांच्यासह सहाय्यक फौजदार शशिकांत नागरगोजे, अनिल सकवान,प्रवीण तालकोकुलवार,रंजना सोयाम, मोहन कुडमेथे,संजय खांडेकर, खुशाल सुरपाम, संतोष मडावी, मंगेश सलाम, संदीप बोरकर,नहीम शेख यांचे विशेष लक्ष आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.