पुन्हा कोरोनाचा विस्फोट, आज 31 पॉजिटिव्ह

रुग्णसंख्येने पार केला 600 चा आकडा, कुंभारखनीत 9 पॉजिटिव्ह

0

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी दिनांक 24 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विस्फोट दिसून आला. आजच्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाने 600 चा आकडा पार केला. आज तब्बल 31 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले 12 व्यक्ती आरटी-पीसीआर टेस्टनुसार तर 19 व्यक्ती रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले. गुरुवारी कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 608 झाली. दरम्यान आजचा दिवस धक्कादायक ठरला, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे कोरोना पॉजिटिव्ह आलेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. तर तेली फैल येथील कोविड हॉस्पिटलविरोधात स्थानिक महिलांचे उपोषण आज दुस-या दिवशीही सुरू होते.

आज यवतमाळहून 41 अहवाल प्राप्त झाले. यात 12 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 29 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 30 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 50 अहवाल येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात एकूण 608 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 473 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 116 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 15 झाली आहे.

कुंभारखनीत कोरोनाचे 9 रुग्ण
आज शहरात काळे ले आऊट येथे सर्वाधिक 3 रुग्ण आढळून आलेत. इंदिरा चौक येथे 2, तर जैन ले आऊट, जनता शाळा परिसर, गोकुळनगर, विठ्ठलवाडी, विराणी टॉकिज परिसर व शास्त्रीनगर परिसर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात कुंभारखनी येथे 9 रुग्ण, शिंदोला येथे 3 रुग्ण, चिखलगाव येथे 2, राजूर येथे 2, येनक येथे 2, बेलोरा येथे 1, सुंदरनगर येथे 1 रुग्ण निष्पन्न झाला आहे.

आज 12 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 12 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 116 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 50 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 66 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 20 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 62 व्यक्ती भरती आहेत.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार कोरोना पॉजिटिव्ह
आज तालुकावासियांसाठी धक्कादायक ठरला. आज सकाळी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिली. त्यांच्यावर सध्या नागपूर येथील सेव्हन स्टार रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अत्यावश्यक कामासाठी पीएशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी मतदारसंघातील लोकांना केले.

आज उपोषणाचा दुसरा दिवस
वणीतील लोढा हॉस्पिटल येथे सुरू होणारे डेडिकेटेड हॉस्पिटल शनिवार पासून सुरू होणार आहे. दरम्यान वस्तीत हॉस्पिटल सुरू करण्यास परवानगी देऊ नये या मागणीसाठी  तेली फैल येथील काही महिलांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस होता. दरम्यान डेडिकेटेड कोविड रुग्णालय लोकांच्या सोयी सुविधेसाठी आहे. कोरोनाचा संसर्ग तीन फुटांपेक्षा अधिक अंतरावरून होत नाही त्यामुळे स्थानिकांनी भीती बाळगू नये. असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले. सदर हॉस्पिटल कायदेशीर बाबी पूर्ण करून सुरू होत असून स्थानिकांचा विरोध विनाकारण व गैरसमजातून होत आहे. जर कुणी कायद्याचा भंग करेल तर प्रशासन त्यांचे कर्तव्य पार पाडेल असे ही प्रसासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.