प्रजासत्ताक दिनानिमित्त माळी समाज संघटनेतर्फे अभिवादन

महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पार्पण

भूषण आदे, वणी: प्रजासत्ताक दिनानिमित्त माळी समाज संघटनेतर्फे 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता माळीपुरा वणी येथील फुले दांपत्य चौकात अभिवादन कार्यक्रम पार पडला. फुले दांपत्य यांच्या तेलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माळी समाज संघटनेचे अध्यक्ष प्रवीण निकोडे, उपाध्यक्ष दशरथ निकोडे, तसेच सल्लागार समितीचे प्रमोद निकुरे, पिसाराम वाढई, बापूजी वाढई, हर्षल शेंडे, कुणाल चौधरी, भास्कर मोहरले, बंडू वाढई, गजानन बोरुले यांनी परिश्रम घेतले. माळी समाज महिला संघटना वणीच्या सचिव रेखा रासेकर, उपाध्यक्ष पूजा गुरनुले, प्रणाली निकोडे, कुंदा निकोडे, रंजना वाढई, मीरा वाढई, विद्या मांदाडे यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.