विवेक तोटेवार, वणी: कोविड- 19 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जीवनावश्यक नसलेल्या अनेक व्यासायिकांचे प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मद्य विक्रीची दुकाने पूर्णपणे बंद आहे. याचा फायदा घेत काही जणांनी मोहाची दारू विकण्याचा प्रताप केला आहे. यातील तीन आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विदेशी व देशी दारू बंद असल्याने काही जणांनी मोहाची दारू विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. याबाबत वणी पोलिसांना 21 एप्रिल मंगळवार दुपारी माहिती मिळाली. माहितीवरून डीबी प्रमुख गोपाळ जाधव यांनी पथकातील लोकांना घेऊन घटनास्थळी रवाना झाले.
पोलिसांनी कवडू गणेश आत्राम (22) सर्वोदय चौक, विलास पंढरी काळे (46) बोधे नगर चिखलगाव, दिलीप कवडुसिंग क्षीरसागर (36) यांना अटक करून त्यांच्याकडून 12 लिटर मोहाची दारू जप्त करण्यात आली. ज्याची किंमत अंदाजे 6000 रुपये आहे.
आरोपींवर कलम 65 (क) महाराष्ट्र दारुबंदी कायदा सह.कलम 269, 270 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दारूचे दुकान बंद आहे. तसेच ब्लॅकमध्ये मिळणारी दारू ही सहज मिळत ऩसल्याने आता तळीरामांचे पाय गावठी दारूकडे वळताना दिसत आहे.