वणीतील साई सुपर मार्टमध्ये एमआरपीवर 5 ते 50 टक्यांपर्यंत सूट
मोफत घरपोच सेवा देखील उपलब्ध, प्रत्येक खरेदीवर सॅनिटायझर बॉटल फ्री
विवेक तोटेवार, वणी: वणीतील टागोर चौक परिसरात नुकतेच सुरू झालेले साई सुपर मार्केट हे ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उरत आहे. अल्पावधीत या प्रतिष्ठानाने ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. इथे ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या उच्च दर्जाच्या वस्तू उपलब्ध आहेत. शिवाय या वस्तूंवर एमआरपीवर 5 ते 50 टक्के* पर्यंत दिली जाणारी सूट ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. याशिवाय ग्राहकास प्रत्येक खरेदीवर एक सॅनिटायझरची बॉटल फ्रि दिली जात आहे.
दिनांक 18 ऑक्टोबर रोजी शहरातील टागोर चौक येथे साई सुपर मार्ट या सुपर बाजारचे उद्घाटन झाले. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. साई सुपर मार्टमध्ये किराणा माल, डेअरी व बेकरी प्रॉडक्ट. ड्राय फ्रुट, थंड पेय. होम केअर प्रॉडक्ट, पर्सनल केअर प्रॉडक्ट, बेबी केअर प्रॉडक्ट, हेल्थ केअर प्रॉडक्ट या शिवाय फळ आणि भाज्या देखील उपलब्ध आहेत.
एमआरपीवर 5 ते 50 टक्क्यांपर्यंतची सुट*
कुठल्याही दुकानामध्ये एमआरपीपेक्षा कमी दरात वस्तू ग्राहकांना दिली जात नाही. मात्र साई सुपर मार्टमध्ये ग्राहकांना चक्क एमआरपीवर 5 ते 50 टक्क्यांपर्यंतची सूट दिली जात आहे. यात अनेक नामवंत ब्रॅंडचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येक खरेदीवर सॅनिटायझरची बॉटल फ्रि दिली जात आहे.
ऑनलाईन ऑर्डर व घरपोच सेवा देखील उपलब्ध
सध्या अनेकांना वेळे अभावी किंवा इतर कोणत्या कारणासाठी प्रत्यक्ष खरेदीसाठी दुकानात जाणे शक्य नसते. अशा ग्राहकांसाठी ऑनलाईन ऑर्डर करण्याची सेवा देखील उपलब्ध आहेत. यात तुम्हाला एका मॅसेजवर आपली सर्व ऑर्डर घरपोच दिली जाते. साई मार्टची सेवा वर्षभर सुरू असून ती कोणत्याही दिवशी बंद नसते. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही दिवशी खरेदी करता येणे शक्य आहे.
कोविड 19 निमित्त विशेष काळजी
सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने इथे ग्राहकांची विशेष काळजी घेतली जाते. शासनाने व्यापारी प्रतिष्ठाणांना जे मार्गदर्शन तत्वे जाही केले आहेत त्या सर्व गोष्टींचे इथे पालन केले जाते. ग्राहकांना प्रवेश देण्याआधी आधी हात सॅनिटाईज केले जाते. तसेच पॅकिंग करण्यासाठी बायोप्लास्टिकचा वापर करण्यात येतो.
घरपोच सेवेसाठी किंवा ऑनलाईन ऑर्डरसाठी ग्राहकांना 8669505056 या क्रमांकावर व्हॉट्स ऍप किंवा कॉल करून संपर्क साधायचा आहे. किंवा येथे क्लिक करूनही ऑनलाईन ऑर्डर आणि घरपोच सेवा प्राप्त करता येऊ शकते. ग्राहकांनी एकदा टागोर चौकातील केवीसी हाईट्स येथील साई सुपर मार्टला एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. (*नियम व अटी लागू)
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)