पोलीस विभागाला बँकेचा हात… 50 बॅरिकेट व टॅब भेट

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅम्प शाखेचा स्तुत्य उपक्रम

अमरावती: कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी तत्पर असलेल्या पोलिसांना बंदोबस्तासाठी बॅकिकेट्स व पोलिसांच्या पाल्यांच्या प्रशिक्षणासाठी टॅब भेट देण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅम्प शाखेतर्फे हा स्तुत्य उपक्रम राबवला गेला. बुधवारी दिनांक 15 डिसेंबर रोजी 50 बॅरिकेट्स आणि 10 टॅबचे पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांना सुपुर्द करण्यात आले.

शहरातील कायदा व सुव्यस्था कायम ठेवण्यासाठी बंदोबस्तादरम्यान मोठ्या प्रमाणात बॅरिकेट्सची आवश्यकता आहे. तसेच पोलीस कर्मचा-यांच्या पाल्यांना इ लायब्रेरी व ऑनलाईन शिक्षणासाठी टॅबची गरज होती. ही गरज लक्षात घेऊन ब्रँकेचे कर्मचारी ब्रिजेश सिंगलवार यांनी पुढाकार घेत ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार पोलीस विभागाला 50 लोखंडी बॅरिकेट्स व 10 टॅब देण्याचे निश्चित झाले.

बुधवारी बँकेचे उपमहाप्रबंधक पंकज कुमार बर्नवाल, सहा. महाप्रबंधक कुमार आनंद, उमेश ढाके, मुख्य प्रबंधक नीलेश सराड, उपप्रबंधक अमोल राऊत, मंगेश मिसाळ, ब्रिजेश सिंग, ब्रिजेश सिंगलवार यांनी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांची भेट घेत त्यांना बॅरिकेट्स व टॅब सुपुर्द करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त एम एम मकानदार यांची देखील उपस्थिती होती.

पोलीस आयुक्तांनी पंकजकुमार बर्नवाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान डॉ. आरती सिंग यांनी बंदोबस्तासाठी बॅरिकेट्स मोठी भूमिका बजावतो. टॅब आणि बॅरिकेट्सच्या भेटीमुळे पोलीस विभागालाचा याचा चांगला फायदा होईल म्हणत बँकेचे आभार मानले. तर यापुढेही सामाजिक कार्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया कायम तत्पर राहणार अशी ग्वाही पंकज कुमार बर्नवाल यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॅम्प शाखेच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.