वेकोलि कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

वणीतील जैन ले आऊट येथील घटना

रमेश तांबे, वणी: शहरातील जैन लेआऊट येथे राहणा-या वेकोलि कर्मचाऱ्याने घरी कोणीही नसताना घरातील पंख्याला दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्मा केली. सोमवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. सचिन बापूराव बोभाटे (39) असे मृत कर्मचा-याचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की सोमवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी सचिनच्या घरची मंडळी वरोरा रोड वरील गुंजच्या मारोती येथे जेवणासाठी गेली होती. त्यावेळी सचिन एकटाच घरी होता. संध्याकाळी कार्यक्रम आटोपून घरची मंडळी घरी परत आली असता त्यांना घराचे समोरचे दार आतून बंद असल्याचे आढळले. त्यांनी मागील दाराने घरात प्रवेश केला असता त्यांना सचिन हा पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

सचिनच्या वडिलांनी शेजा-यांना ही बाब सांगितली व त्यांच्या मदतीने सचिनला खाली उतरवले. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. पोलिसांनी या प्रकरणी मृत्यूची नोंद केली आहे. सचिनच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

हे देखील वाचा:

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

…. आणि एसटी कर्मचा-याची पत्नी पोहोचली कीटकनाशकाची पुडी घेऊन

आनंदाची बातमी… वणी सुरू होत आहे फुड डिलिव्हर ऍप

Comments are closed.