वनोजा येथे 50 लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त

विशेष पोलीस पथकाची दुसरी मोठी कार्यवाही

0

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत वनोजा (देवी) येथे अवैधरित्या साठवणूक केलेली तब्बल कार्यवाहीत सुमारे 400 ट्रक रेती (3 हजार ब्रास) रेती जप्त करण्यात आली. या रेतीची किंमत सुमारे 50 लाख रुपये इतकी होते. जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी नेमलेल्या विशेष पोलीस पथकाने मंगळवार 8 जून रोजी सायंकाळी 4 वाजता ही कार्यवाही केली. पुढील कारवाईसाठी प्रकरण महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. सदर कारवाई ही अलिकडे करण्यात आलेली जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

विशेष पोलीस पथक प्रमुख सपोनि मुकुंद कवाडे यांना वनोजा शिवारात एका शेतात मोठ्या प्रमाणात अवैध रेती साठवून असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून पथकाने हिवरा ते गोरज मुख्य रस्त्याच्या बाजूला शामराव जीवतोडे रा. गोरज, ता. मारेगाव यांचे खुल्या शेतात साठवणूक केलेली तब्बल 400 ते 500 ट्रक रेती धाड टाकून जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या रेती साठ्याचे फोटो व चित्रीकरण करण्यात आले. 

प्रकरण महसूल विभागाशी निगडित असल्यामुळे उप विभागीय अधिकारी वणी डॉ. शरद जावळे याना माहिती देण्यात आली. तसेच मारेगावचे तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना योग्य ती कारवाईसाठी मोक्यावर पाचारण करण्यात आले. मंडळ अधिकारी यांना लेखी तक्रार, पंचनामा व फोटो व्हिडीओ सादर करण्यात आले असून महसूल विभाग पुढील कारवाई करणार आहे.

सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक वणी व पांढरकवडा उपविभागीय प्रमुख सपोनि मुकुंद कवाडे, पोलीस हवालदार राजू बागेश्वर, पोका जितेश पानघाटे, पोका निलेश भुरे, शिपाई मुकेश करपते, मिथुन राऊत व पोलीस वाहन चालक अजय वाभीटकर यांनी पार पाडली.

हे देखील वाचा:

आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण, दुसरी लाट ओसरतेय

लालपरी सुरू झाली, मात्र प्रवासी फिरकेना

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.