शिबला येथे गावठी हातभट्टीवर पोलिसांची धाड

53 हजारांची दारू व मारुती कार जप्त....

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिबला येथे दोन ठिकाणी पाटण पोलिसांनी छापा मारून एक मारुती 800 क्रमांक याच्यासह 53 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिबला येथे गावठी हातभट्टीची दारू चारचाकी मध्ये नेत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार अमोल बारापात्रे याना मिळल्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अभिमान आडे रत्नाकर सलामे संदीप सोयाम अंकुश पातोडे नरेश गोडे हे वाहनाने शिबला ते घोंसा जाणाऱ्या मार्गावर माहिती प्रमाणे पोहचले. तिथे मारुती 800 होती. त्या गाडीची झडती घेतली असता त्यात प्लॅस्टिकच्या दोन कॅन मध्ये 5 ,5 लिटर असे 10 लिटर गावठी हातभट्टीची दारू किंमत 2 हजाराची मिळाली यावरून आरोपी प्रदीप मुकुंदा बोन्डे रा .घोंसा याला ताब्यात घेऊन दारू व वाहनासह असा 52 हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आले.

दुस-या एका घटनेमध्ये पोलिसांना 2 मेला शिबला येथे गावठी हातभट्टीची एक व्यक्ती दारू काढत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी धाड मारली असता त्यांना अतुल रामप्रसाद टेकाम रा. शिबला यांच्या घराच्या आजूबाजूला दारू बाबत झडती घेतली असता त्यांच्या घरातील बाथरूममध्ये प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये 5 लिटर गावठी दारू किंमत 1 हजार रुपयांची मिळून आली.

यावरून सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. दोन्ही घटनेतील एकूण 53 हजाराचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आले. पाटण पोलिसांच्या कार्यवाहिच्या सपाट्याने हातभट्टीची गावठी दारू काढणार्याचे दाबे दणाणले आहे.

लॉकडाऊनमुळे देशी विदेशी दारूचे दुकाने बंद करण्यात आल्याने मद्यपींचे मोठे हाल झाले आहे. देशी विदेशी दारू मिळत नसल्याने ग्रामीणसह शहरी भागातील उच्च प्रतीची दारू पिणारे मद्यपी सुद्धा आता झरी तालुक्यात गावठी दारू करिता वळले आहे. आपली आलिशान चारचाकी घेऊन वणी मारेगाव पांढरकवडा व तालुक्यातील शौकीन हातभट्टीच्या गावठी दारू करिता येत असून 10 ते 20 लिटर गावठी दारू गाडीत घेऊन जात आहे.

देशी विदेशी दारू मिळत नसल्याने गरिबा पासून तर श्रीमंतापर्यंत हातभट्टीच्या गावठी दारू करिता धावपळ करीत आहे. तालुक्यातील अनेक जंगलातील नदी नाले असलेल्या ठिकाणी हातभट्टीची गावठी दारूचा महापूर वाढला असून पोलिसही छापे मारून त्रस्त झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.