सावधान! ‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष दाखवून तरुणीला 65 हजारांचा गंडा

इन्स्टाग्रामवरून जॉब सर्च करणे पडले महागात

जितेंद्र कोठारी, वणी: सोशल मीडियावरून जॉब सर्च करणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले. एका अज्ञात भामट्याने पॅकिंगचे काम देण्याचे आमिष दाखवत चक्क 65 हजाराने गंडवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीविरुद्द तक्रार दाखल केली. वणी परिसरात सातत्याने सायबर गुन्हे उघडकीस येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

प्राप्त माहितनुसार तरुणीचे इंस्टाग्राम या सोशल प्लेटफार्मवर अकाउंट आहे. त्यावर ती नेहमी जॉब सर्च करायची. दिनांक 9 जुलै रोजी इंस्टाग्राम बघत असताना तिच्या अकाउंटवर घर बसल्या नटराज पेन्सिल पैकिंग जॉब संदर्भात जाहिरात दिसली. त्यावर तरुणीने कामासाठी अप्लाय केला. तरुणीने ऑनलाईन अप्लाय करताच 8535867319 या मोबाईल क्रमांकावरून तिला व्हाटसअप कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने नटराज पेन्सिल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून तुमचा आयडी कार्ड उद्या तुम्हाला मिळून जाईल असे सांगितले.

दुसऱ्या दिवशी 10 जुलै रोजी तरुणीच्या व्हाटसअप नंबरवर त्यांनी आयडी कार्डचा फोटो पाठवला. तसेच आयडी कार्ड कुरियरद्वारे पाठविल्याची माहिती दिली. 11 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता दरम्यान तिला 8005416068 या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्यांनी मी डिलिवरी बॉय बोलत असून तुमचा आयडी कार्ड रिन्युव्ह करायचा आहे, त्यासाठी तुम्ही 3 हजार 500 रुपये फोन पे करा असे सांगितले.

त्याच्या सांगण्यावरून तरुणीने आपल्या भावाच्या मोबाईल वरून 8535867319 या मोबाईल नंबरवर 3 हजार 500 रुपये फोनेपे द्वारा ट्रान्सफर केले. त्यानंतर त्याच दिवशी वेगवेगळे कारणे देऊन तिला 64 हजार 515 रुपये फोनपे वरून पाठविण्यास भाग पाडले. पैसे पाठवून 3 महिले उलटूनही तरुणीला पार्सल मिळाले नाही. त्यामुळे तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 

23 ऑक्टो. रोजी तरुणीने वणी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीने वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून 64 हजार 515 रुपयाने तिची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी 8535867319 मोबाईल क्रमांक धारक अज्ञात व्यक्ती विरुद्द कलम 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.कॉ. विठ्ठल बुरेवार करीत आहे.

 

ऑनलाईन ठगांपासून सावधान
केवायसी करायचे आहे, लॉटरी लागली, कॅशबॅक, एटीएम बंद झाले, इन्स्टन्ट लोन, क्रेडिट कार्ड देतो अशी बतावणी करून ऑनलाईन फसवणूक केली जाते. ऑनलाईन वस्तू खरेदी करताना अनोळखी वेबसाईटवरून खरेदी करणे टाळावे. कोणत्याही व्यक्तीला आपले फोनपे, गूगल पे क्यूआर कोड, यूपीआय आयडी, एटीएम कार्डवरील नंबर, सिव्हीवही, ओटीपी, पासवर्ड सांगू नये. तसेच एनीडेस्क सारखे कोणतेही ऍप्लिकेशन डाउनलोड करू नये. बँकेतून पैसे काढल्याची माहिती मिळताच तात्काळ बँकेशी व पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

हे देखील वाचा:

900 रुपयांच्या नादात गमविले अडीच लाख रुपये

परिसरात ऑनलाईन पाकीटमारी, सर्वसामान्यांची फसवणूक

सावधान… कॅशबॅकच्या नावाखाली अनेकांना फेक कॉल

त्याने मारली शाईन अन् चोट बसली ऑनलाईन…

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.