दारूभट्टी फोडणा-या 9 आरोपींना अटक

91 हजारांच्या दारूची चोरी, दामले फैलातील घटना

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एस बी दानव यांच्या मालकीच्या देशी दारूच्या दुकानातून दारू चोरीला गेली होती. त्याबाबत 2 ऑगस्ट रोजी तक्रार करण्यात आली होती. या प्रकऱणी पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दुचाकी, चारचाकी वाहन असा एकूण 6 लाख 50 हजार पाचशे 65 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहरात दामले फैल परिसरात एस बी दानव यांच्या मालकीची देशी दारूची भट्टी आहे. ही भट्टी दिनांक 16 जून ते 2 ऑगस्ट दरम्यान मागच्या बाजूने फोडून तेथून 91 हजार 200 रुपयांची देशी दारू चोरी गेल्याची तक्रार भट्टीचे व्यवस्थापक पंढरी मेश्राम यांनी वणी पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारीवरून पोलिसात अज्ञात आरोपीविरोधात कलम 557, 380, 381, 411, 188, 269 भादवी व सहकलम 3, 4 साथीचे रोग अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल होताच डीबी पथकाने तापसाचे चक्र फिरविले. दानव यांच्या दुकानात एका महिन्यांपूर्वी गणेश भूमन्ना संगतीवार काम करीत होता. परंतु काही कारणावरून त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. याच्यावर संशय असल्याचे दानव यांनी पोलिसांना बोलून दाखविले.

पोलिसांनी माहिती काढत गणेश भूमन्ना संगतीवार (34) रा. दामले फैल व त्याचे साथीदार उमेश उत्तम मडावी (29) रा. रंगारीपुरा, पवन गणेश मेश्राम (25) रा. रंगनाथ नगर व राकेश ज्योतिराम किनाके (20) खडबडा वणी. यांना अटक केली.

त्यांनी ही चोरी केलेली दारू भारत उर्फ पिंटू दुर्गना रामगिरवार (34) रा. गायकवाड फैल, राजू मारोती अलीवार (21) रा. गायकवाड फैल, अमर रामलाल कनकुंटलावार (30) रा. दामले फैल, हरीश उर्फ टिक्का संजय रायपुरे (19) रा. दामले फैल, रामेश्वर मनोहर साळुंखे (32) रा. गोकुलनगर यांना विकली. डीबी पथकाने या 9 आरोपींना अटक केली आहे.

आरोपींकडून 70 हजार 464 रुपयांची दारू व या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी, टाटा सुमो क्रमांक MH23 E 8816 व एक लोखंडी आरी. असा एकूण 6 लाख 50 हजार 564 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये दारू विकणाऱ्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर विकत घेणाऱ्यांना कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुदर्शन वनोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.