पुरुषोत्तम नवघरे, वणी: बुधवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी हा ऑनलाईन कोर्स विद्यार्थ्यांना मोफत करता येणार आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा कोर्स चालणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत हा कोर्स असून याला यूनिसेफ या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी राज्यातील 1 लाख 11 हजार 111 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा एक विश्वविक्रम राहणार असून याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्याकरिता विद्यार्थ्यांना https://skills.myp2e.org या लिंक वर दिनांक 5 डिसेंबर पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. या अभ्यासक्रमात दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे विविध डिजिटल टूल, वर्ड, एक्सेल, इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. शहजाद, डॉ. रंजना जिवने व डॉ. रोहित वनकर यांनी केले आहे
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.