कॅन्सरपीडित महिलेस दिला मदतीचा हात

युवा नेत्याने जोपासला मानवतेचा जिवंत झरा

0

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरड्या वाटणाऱ्या जगात आजही माणुसकीचा झरा आजही जिवंत आहे. हीच मानवता आशीष खुलसंगे या युवा नेत्याने जोपासला. आशीष यांनी मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 11 तील एका कँसरपीडित महिलेस पाच हजार रूपये रोख, आवश्यक धान्य आणि किराणा दिला. यावेळी वणी विधानसभाक्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार यांची प्रमुख उपस्थित होते.

ही महिला काबाडकष्ट, मोलमडजुरी करून आपले पोट भरते. अशातच तिला कँसर झाला. आधीच गरिबी त्यात ओढवलेले हे दुसरे संकट. त्यामुळे आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या महिलेस आशीष यांनी धीर दिला. व्यक्तिगत पातळीवर जमेल तेवढी मदत केली. तिला जगण्याचं बळ मिळाल्याने ती आता खंबीर झाली. या आपत्तींमध्येही ती ठाम उभी राहिली. त्यात समाजातील काहींनी तिला मदत करायला सुरुवात केली. ही बातमी आशीष खुलसंगे यांना कळली. वामनराव कासावार यांच्यासह ऍड. देविदास काळे, विवेकानंद मांडवकर, ओम ठाकूर, शंकर मडावी, दुष्यंत जयस्वाल, ऍड. पठाण, खालीद पटेल यांच्या उपस्थितील आशीष यांनी हे महत्कार्य केलं. यावेळी मारेगाव येथील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आशीष यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

खचलेल्या व्यक्तींना धीर देणे गरजेचे – आशीष खुलसंगे
पीडितांना मदत करण्याचा वसा आपल्याला पुर्वापार मिळाला आहे. संतांनी आपल्याला मानवतेचा संदेश दिला आहे. अशा महामानवांनी दिलेल्या प्रेरणेतूनच आपण हे कार्य करीत आहे. अशा खचलेल्या व्यक्तींना धीर देण्याची गरज असते. त्यामुळेच फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करण्याचे ठरवले. अशा अशा पीडित लोकांना समाजातील सधन लोकांनी या महिलेस मदत करावी,
– आशीष खुलसंगे, नेते काँग्रेस

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.