मुकुटबन यथे लसीकरण व मार्गदर्शन शिबिर

पांढरकवडा येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना लसीकरण व शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. पावसाळा सुरू होताच पाळीव जनावरांना घटसर्प, एकटांग्या, सांसर्गिक गर्भपात सारखे आजार जनावरांना होतात. तसेच गोचीड व माश्यांमुळे इतरही आजार जनावरांना होतात. त्यामुळे अनेक जनावरे दगावतात ज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.

याच अनुषंगाने मुकुटबन येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात ७ ऑगस्ट रोजी लसीकरण व शेतकरी यांच्या करिता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन कृषी महाविद्यालय कोंघारा ता केळापूर पांढरकवडा कॉलेजची विद्यार्थिनी कु. तृप्ती शंकर लाकडे, राव एन चारज, प्रा एच देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ बालाजी जाधव, सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच मधुकर आगुलवार व डॉ भोयर होते. उपस्थित मान्यवरांनी जनावरांना होणाऱ्या आजारा बाबत माहिती देऊन त्याबाबत उपयोजना कसे करायचे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात अनेक शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.