विवेक तोटेवार, वणी: शहरातील जटाशंकर चौकात कीटकनाशके खरेदी करण्यास आलेल्या शेतकऱ्याच्या खिशातून 9 हजार रुपये चोरी गेले होते. शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) मुलास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पैसे व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
वनोजादेवी येथील रहिवाशी असलेले जनार्दन तुकाराम गाडगे (60) हे शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी कीटकनाशके खरेदी करण्याकरिता वणीत आले होते. त्यांनी वणीतील जटाशंकर चौकात स्थित गोविंद ऍग्रो मधून कीटकनाशके खरेदी केले. नंतर ते भाजी खरेदीकरिता गेले असता त्यांच्या पँटच्या खिशातील 9 हजार रुपये चोरी गेल्याचे त्यांना लक्षात आले.
गाडगे यांनी त्वरित पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाने आरोपीस शोधण्याची मोहीम राबविली.
डीबी पथकाला सदर पैसे सेवानगरातील एका अल्पवयीन मुलाने चोरले असल्याचे कळळे. डीबी पथकाने आज शनिवारी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याच्याजवळून 2500 रुपये नगदी व गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी (MH 29 BK 9281) किंमत 30 हजार असा एकूण 32500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.