जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातून 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली. मुलीच्या वडिलांनी शिरपूर पोलीस ठाण्यात कुणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार नोंदविली आहे.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून दोघे शिक्षण घेत आहे. बुधवार 23 ऑगस्ट रोजी सकाळी पती पत्नी दोघे नेहेमीप्रमाणे मजुरी कामावर निघून गेले. त्यावेळी मुलगी घरीच होती. सायंकाळी कामावरून घरी परत आले असता मुलगी घरात दिसून आली नाही.
शेजारी तसेच गावात शोध घेतले असता ती मिळून आली नाही. नातेवाईकांना फोन करून मुलगी तुमच्याकडे आली का, असे विचारले असता त्यांनी नकार दिला. अखेर मुलीच्या वडिलांनी गुरुवार 24 ऑगस्ट रोजी दुपारी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. तक्रारीत त्यांनी गावातीलच एक मुलगा त्यांच्या मुलीसोबत कधी कधी फोन वर बोलत होता. तसेच तो मुलगा बुधवार पासून गावात नसल्याने त्याच्यावर मुलगी पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला.
फिर्यादी वडिलांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी कलम 363 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास शिरपू पोलीस करीत आहे.
Comments are closed.