अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले: राजूर येथील घटना

अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: राजूर कॉलरी येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही सोमवार 9 ऑक्टोबर रोजी घरून निघून गेल्याची घटना उघडकीस आली. तिला कुणीतरी अनोळखी इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वणी पोलिसात तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. मुलीचे वडील हे त्यांच्या कुटुंबासह राजूर येथे राहतात. दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी वडील व आई कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी 6 वाजता वडील घरी आल्यानंतर त्यांना त्यांची मुलगी घरी दिसून आली नाही. त्यांनी लहान मुलीला याबाबत विचारणा केली असता दुपारी 2 वाजता ती घरी होती. त्यानंतर ती घरी नाही असे सांगितले. वडिलांनी आपले शेजारी तसेच नातेवाईकांना याबाबत विचारणा केली. ती कुठेही मिळून आली नाही. शेवटी वडिलांनी वणी पोलिसात आपल्या मुलीला कुणीतरी अनोळखी इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वणी पोलिसात दिली. त्यांच्या तक्रारीनुसार वणी पोलिसात कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.