बहुगुणी डेस्क, वणी: एका अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेले. शनिवारी ही घटना घडली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पीडितेचे वडील हे वणीतील रहिवासी असून ते मजुरीचे काम करतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगा व दोन मुली आहे. त्यांची एक मुलगी ही 16 वर्ष 10 महिन्याची आहे. ती तिच्या आईला घरकामात मदत करायची. शनिवारी दिनांक 8 जून रोजी सकाळी नेहमी प्रमाणे मजुरीसाठी गेले. तर त्याची पत्नी या घरकामासाठी गेल्या होत्या. संध्याकाळी मुलीचे वडील घरी आले. तेव्हा त्यांच्या मुलाने त्याची बहिण काही तासांपासून घरी नसल्याची माहिती दिली.
मुलीच्या वडिलाने तिचा शेजा-यांकडे शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही. त्यांनी नातेवाईकांना विचारपूस केली असता त्यांना तिचा कोणताही पत्ता लागला नाही. दरम्यान त्यांना तिला कुणीतरी फूस लावून पळवल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत त्यांनी याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मुलीचा शोध पोलीस घेत आहे.
Comments are closed.