आज दुपारी 2 वाजता जैताई देवस्थान येथे संगीत सभेचे आयोजन

गुरुपौर्णिमा व आषाढी एकादशी निमित्त स्थानिक कलावंत सादर करणार आपली कला

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त्य वणी आज भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहहातील जैताई मंदिर येथे दुपारी 2 ते 5 दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. मासिक संगीत सभा व जैताई देवस्थानातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात स्थानिक कलावंत आपली कला सादर करणार आहे. तर संगीत संयोजन अभिलाष राजूरकर यांचे आहे. या कार्यक्रमाला संगीत प्रेमींनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन करण्यात आले आहे. मासिक संगीत सभा हा उपक्रम वणीतील स्थानिक कलावंताद्वारा राबवण्यात येतो. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन आणि स्टेज मिळावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!