विद्युत रोहित्रावर चढून तार काढताना तरुणाचा मृत्यू

मृतक वणीतील खरबडा परिसरातील रहिवाशी, निलजई-घुग्गुस रोडवरील घटना

0

जब्बार चीनी, वणी:  विद्युत रोहित्र्याचा शॉक लागून वणीतील एका तरुणाचा मृत्यू झाला. पहाटे चार ते पाचच्या सुमारास निलजई घुग्गुस मार्गावरील ही घटना घडली. जावेद शेख (25) असे मृताचे नाव असून तो खरबडा येथील रहिवाशी आहे. या घटनेची शिरपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्ती भल्या पहाटे डीपीवर कशासाठी चढला? याबाबत विविध तर्क लावले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास जावेद शेख हा तरुण त्याच्या एका सहका-याला सोबत घेऊन निलजई-घुग्गुस रोडवर गेले. तिथे असलेल्या एका विद्युत रोहित्र्यावर जावेद चढला. सदर लाईऩ ही वेकोलिची असून ही डमी लाईन आहे.

पोलवर चढून त्याने एक स्पॅनचा तार काढला. त्यानंतर तो दुस-या ताराकडे वळला. मात्र त्यातील एक फेस सुरू होता. जसा तो त्या फेसच्या संपर्कात आला. त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात तो जागीच ठार झाला.

सदर घटना घडताच त्याचा सोबती घाबरला. त्याने तातडीने शिरपूर पोलीस स्टेशन गाठले व घटनेची सर्व माहिती दिली. शिरपूर पोलिसांची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली व त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

लाईनवरून स्पॅन उतरवण्यात आले होते
सदर लाईन ही डब्ल्यूसीलची लाईन असून डमी लाईन आहे. पोलवर चढून मृतकाने त्या डमी लाईनवरचे स्पॅन (तार) उतरवले. दुस-या बाजुने डबल पॉईंट होता. तिथला फेस बंद असल्याचे गृहित धरून तिथला स्पॅन उतवण्यासाठी तो गेला असावा. मात्र त्यातील एक फेस वेकोलिने सुरू ठेवला होता. जशी ती व्यक्ती स्पॅनच्या संपर्कात आली त्याला शॉक बसला, असे प्रथमदर्शनी पाहता वाटते. याशिवाय मृतकाच्या चेह-यावर त्याचे व्रण ही दिसून आले.
– विनोद मानकर, उप कार्यकारी अभियंता, एमएसईबी

सदर लाईनवर भल्या पहाटे जाणे हे संशयास्पद आहे. त्यामुळे ही घटना चोरीच्या उद्देशातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.