‘आदर्श गुरू’ या विषयावर पार पडली वक्तृत्व स्पर्धा
सुरेंद्र इखारे, वणी: गुरू पौर्णिमा उत्सवा निमित्त संस्कार भारती समिती वणी, नगर वाचनालय, सागर झेप व किड्झ इंटरनॅशनल स्कूल तर्फे वणीतील नगर वाचनालयात वक्तृत्व स्पर्धा आदर्श गुरु या विषयावर घेण्यात आली.
ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. अ या विद्यार्थी गटात वर्ग 5 ते 7 मध्ये प्रथम चैताली ठावरी, द्वितीय सिद्दी ठमके, तर ब गट वर्ग 8 ते 10 मध्ये प्रथम प्राजक्ता मंगले द्वितीय रेश्मा देऊळकर यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला.
तर महिला खुला गटात प्रथम बक्षिस तेजस्विनी मंगले, द्वितीय नंदा गुहे यांनी प्राप्त केले. या स्पर्धेत एकूण 30 स्पर्धक होते. स्पर्धेचे परिक्षण स्वप्ना पावडे, राष्ट्पती पुरस्कार प्राप्त रमेश बोबडे, एनबीएसए कॉलेजचे प्राचार्य रोहित वनकर यांनी केले. यावेळी परिक्षकांचे गुरूपूजनही करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष रजनी पोयाम होत्या. तर उद्घाटक म्हणून नगर वाचनालयाचे सदस्य हरिहर भागवत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर मुने यांनी केले तर संचालन गणेश मत्ते व आभार अमित उपाध्ये यांनी मानले.
कार्यक्रमाला माधवराव सरपटवार, तेजराज बोढे, रवी काळे, रवींद्र धुळे, निनाद खाडे यांचे विशेष सहकार्य लागले. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जेष्ठ रंग कर्मी अशोक सोनटक्के, प्रशांत चौधरी, अभिलाष राजूरकर, पौर्णिमा पांडे, सागर जाधव, धीरज पोयाम, कविता चटकी, वनिता काकडे व संस्कार भारती समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.