ऑनलाईन वर्ग ते आकारिक चाचणी पर्यंत …..

अहेरअल्लीची झेड.पी.ची शाळा अजूनही नियमितच

0

सुशील ओझा, झरी: जि.प. उच्च प्राथमिक शाळा अहेरअली येथील विद्यार्थ्यांनी आकारिक मूल्यमापन चाचणी सोडविली. या 2020 शैक्षणिक सत्रात कोविड- 19 च्या भीतीमुळे सर्वत्र ऑनलाईन वर्ग चालू आहेत. अशातच दि 4 जूलै 2020 पासून जि. प. उच्च प्राथमिक शाळा अहेरअली येथील वर्ग अविरत सुरू आहेत .

मागील आठवड्यात म्हणजे दि 22 ते 30 सप्टेंबर या कालावधीत येथील विद्यार्थ्यांनी पहिली चाचणी उत्तम प्रकारे सोडविली. साधारणतः अपेक्षित सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. पुढे शाळा नियमित सुरू होईपर्यंत सुरू राहतील. शाळेतील 8 विद्यार्थांनी जवळपास अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ” महाराष्ट्रातील भविष्यवेधी मुले ” या प्रधान शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांच्या शैक्षणिक व आंतरराष्ट्रीय भाषा अध्ययन गटात समाविष्ट आहेत.

वर्ग 1 ‘ 2 ‘ 3 यांच्या अध्यापनासाठी गावातील तरुण तरुणी ” शिक्षकमित्र ” व काही विषयमित्र म्हणून कार्यरत आहेत. तर वर्ग 4,5,6,7 यांना ऑनलाईन मार्गदर्शन सर्व विषयाचे चालू आहे . भाविष्यात अनेक अडचणींना सामोरे जाताना स्वतःहून शिकण्याची तयारी पाहिजे. त्यासाठी विविध उपक्रम व अॅपस यांचा वापर सुरू आहे .

शाळा बंद; पण शिक्षण सुरू ही अभ्यासमाला व त्याच्या सोबतीला ‘दीक्षा’ अॅप चा नियमित वापर सुरू आहे. झालेला अभ्यास तपासण्याची यंत्रणासुध्दा आहे. वर्गात झालेला अभ्यास गृहपाठ व चाचणी याकडे पालकांचे विशेष लक्ष आहे. तशा प्रकारच्या सूचना वारंवार पालकांना सुध्दा दिल्या जातात. विद्यार्थ्यांच्या हातात नेहमी मोबाईल असल्याने गेम खेळण्याचा मोह होणार नाही याकडे पालकांनी लक्ष देण्याच्या सूचनासुध्दा वारंवार देण्यात येतात.

ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी रस घेताहेत. या कार्यात पालकांसह येथील स. अ. कुतरेकर, गड्डमवार, शिक्षिका बोडणकर यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. या कार्यात पंंचायत समिती झरीच्या कार्यालयाकडून विशेष सहकार्य आहे. BRC कडून अभ्यासमाला तर गटशिक्षण अधिकारी नगराळे यांचे विशेष लक्ष आहे.

वारंवार आढावासभा तसेच प्रत्यक्ष फोनवर संपर्क करून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते. लवकरच प्रथम सत्र परीक्षा होतील. या दृष्टिने सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने नियोजन सुरू आहे . अशी माहिती मुख्याध्यापक शंकर रामलू केमेकार यांनी दिली.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.