वणी बहुगुणी डेस्क: समाजकारणी, राजकारणी आणि दातृत्त्वाचे धनी असलेल्या विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून आज शनिवारी वणी येथील जैताई मंदिराच्या प्रांगणात भव्य मोफत आरोग्य शिबिर, नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर व चष्मे वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दु. 4 या वेळेत हे शिबिर होणार आहे. सदर शिबिरात कस्तुरबा हॉस्पिटल, सेवाग्रामची टीम आरोग्य सेवा देणार आहे. सदर शिबिराचे आयोजन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, व स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन वणी व चोरडिया हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून करण्यात आले आहे. दिनांक 1 ऑगस्ट रोजी पाटण येथे याच शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा – विजय चोरडिया
गेल्या काही वर्षांपासून परिसरात नेत्र चिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत याचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला आहे. या शिबिरात रुग्णांना मोफत औषधी, तसेच चष्मा दिला जाणार आहे. ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांना सेवाग्राम येथे पाठवून मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार केला जाणार आहे. या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा.
– विजय चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते
या शिबिरासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. नाव नोंदणी न झालेल्या रुग्णांना वेळेवर नाव नोंदणी केली जाईल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, चोरडिया हॉस्पिटलची चमू यांच्यासह विजय चोरडिया यांचे सहकारी परिश्रम घेत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क-
विशाल दुधबळे – 9673751678
राजू रिंगोले – 9284881655
अक्षय वैद्य – 9823847616
सचिन क्षीरसागर – 8308340293
Comments are closed.