‘आशे’ लघुचित्रपटाची आंतरराष्ट्रीय महोत्सवात स्क्रिनिंग

स्थानिक कलावंताद्वारे करण्यात आली लघुपटाची निर्मिती

विवेक तोटेवार, वणी: वणीतील कलावंतांनी तयार केलेल्या ‘आशे’ या लघुचित्रपटाचे आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात स्क्रिनिंग होणार आहे. वणतील युवक बहुश युवराज भगत यांनी या लघुपटाची निर्मिती केली असून सर्व स्थानिक कलावंतींनी यात भूमिका केली आहे.

Podar School 2025

‘इडियान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड’ व ब्रिटिश फिल्म फेस्टिवलमध्ये या लघुपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. आशे हा चित्रपट महिलाच्या मासिक पाळीमुळे होणा-या विटाळ या संकल्पनेवर आधारित आहे. या लघुपटात या समस्येचे चित्रण करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या चित्रपटाच शूटिंग तालुक्यातील मोहोर्ली आणि चिखलगाव या गावात झाले आहे. सदर चित्रपट बनविण्याकरिता दोन महिन्याचा कालावधी लागला व 2 लाख रुपये खर्च आला आहे. या चित्रपटात कलाकार म्हणून गीता विधाते, आचल देठे, स्वाती भरसागर, स्वाती खरवडे, मोहन तायडे, सुरेश तुंमे यांनी अभिनय केला.

तसेच साक्षी इंगोले, खुशी इंगोले, विनोद मिडपलवार, अरविंद राजुरकर, धानोत्री तायडे, बहुश भगत हे सहायक कलाकार आहे. या फिल्म च्या निर्मितीसाठी प्रिया निखार भगत, संदीप बेसरकर, गीतेश मेश्राम, सुदीप गौरकार, पिंटू गौरकार यांच्यासह मोहुर्ली व चिखलगाव येथील रहिवाशांनी सहकार्य केले आहे.

Comments are closed.