आझाद हिंद मंडळ गणेशोत्सात बहरलेत ‘रंग स्वरांचे’

डॉ. पूर्णिमा दिवसे. प्रतीक्षा भारदे, भूषण जाधवांच्या गायनांनी बहरली मैफल

0

बहुगुणी डेस्क, अमरावती: शहरातील आझाद हिंद मंडळाला 92 वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी विविध कार्यक्रम इथे होतात. या वर्षी झालेल्या ‘रंग स्वरांचे’ कार्यक्रमात रसिक बहरलेत. शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या विभागप्रमुख तथा आकाषवाणी कलावंत डॉ. पूर्णिमा दिवसे यांनी हा कार्यक्रम सादर केला. सोबतच ई.टी.व्ही महाराष्ट्र गौरव व झी टी.व्ही.संगीत सम्राट फेम भूषण जाधव आणि प्रतीक्षा अनंत भारदे यांनी एकापेक्षा एक अशी बहारदार गीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी  आपल्या दिलखेच आणि अभ्यासपूर्ण संवादांनी रसिकांना खिळवले.

संत ज्ञानेश्वर माऊलीच्या ओम नमोजी आद्या या पदाने डॉ.पूर्णिमा दिवसे यांनी केली. देव गृही या, बोलावा विठ्ठल, तसेच उगवली शुक्राची चांदणी, रेशमाच्या रेघांनी असे अनेक गीतप्रकार डॉ.पूर्णिमा यांनी सादर केलीत. याशिवाय भूषण जाधव, डॉ. पूर्णिमा, प्रतीक्षा भारदे यांनी प्रेक्षकांच्या आवडीची काही युगलगीतेही सादर केलीत.


सूर निरागस हो पासून तर मन उधाण वाऱ्याचे, ढिपाडि डिपांग,नदिच्या पल्याड, अंबे गोंधळाला ये तसेच सुफी गाणे पिया रे पिया रे गाऊन श्रोत्यांची मने जिंकलीत. प्रतीक्षा यांनी अधीर मन झाले, दही दूध लोणी ही गीते सादर केलीत. वाजले की बारा ही लावणी पूजा कडू यांनी सादर केली.

यामधील वाद्दवृंद कालाकार प्रवीण जोंधळेकर, आकाश थोरात, सतीश मंडले, अनंत भारदे यांनी अप्रतिम साथसंगत केली. सागर भालचक्र आणि प्रीतम बारई यांनी सुंदर कोरस दिला. दरम्यान वैभवी बोडे आणि सायली गणवरी यांच्य कथकनृत्याने कार्यक्रमात बहर आला. ध्वनिव्यवस्थापन कमलेश बिजोरे यांनी केलं.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, कार्याध्यक्ष डॉ. सैय्यद अबरार,  उपाध्यक्ष दिनेश खत्री, नीलेश ठाकरे, कोषाध्यक्ष मयुर जलतारे, सचिव दीपक वैद्य, सहसचिव धर्मेश आलेकर, नीलेश वानखडे, सागर इंगोले, अनिकेत नवघरे आणि शुभम काशिकर आणि सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.