तंत्रशुद्ध व्यवस्थापन करून तुरी पिकांचे भरघोस उत्पादन
प्रा. दिलिप अलोणे यांनी घेतले एकरी 13 क्विंटल उत्पादन
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील प्रगतशील शेतकरी प्रा. डॉ अलोणे यांनी तंत्रशुद्ध व्यवस्थापन करून भरघोस तुरीचे पिकांचे उत्पादन घेत शेकऱ्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. निसर्गाने शेतकऱ्याकडे पाठ फिरवली असताना हंगामात तुरीचे भरघोस उत्पादन घेतले आहे.
सोयाबीन मध्ये १० फूट अंतरावर २ फूट अंतराने तुरीची लागवड करीत ही किमया अलोणे यांनी साधली . एकरी १२ ते १३ क्विंटल उत्पादनाची शक्यता प्रत्यक्ष भेट देणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.प्रा अलोणे यांनी ५ एकरावर तुरीची लागवड केली असून तीस व साठ दिवसावर दोनदा छाटणी केली. फुलावर येण्यापूर्वी व शेंग परिपक्व होत असताना दोन वेळेस ओलिताची नियोजन त्यांनी केले. विशेष म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता जैविक औषधांचाच त्यांनी वापर केला.
पाच एकरात तुरीच्या विविध वाणांची लागवड केली असून त्यांच्या संशोधनातून अलोने यांनी विकसित केलेल्या संपदा या वानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तालुका कृषी अधिकारी आनंद बद्दकल यांचे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत कमी खर्चात जास्त उत्पादन मिळविले आहे. इतर पिकासाठी वाढलेला अनाठायी उत्पादन खर्च लक्षात घेता तुरीकडे नगदीचे पीक म्हणून व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांचा अंधुक फायदा होऊ शकतो असा विश्वास डॉ अलोणे यांनी व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: