धुळवडीच्या दिवशी दुचाकीचा अपघात, चालक ठार

बेलोरा फाट्याजवळील घटना, झाडाला दुचाकीची धडक

बहुगुणी डेस्क, वणी: चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी झाडाला धडकली. या अपघातात दुचाकी चालक ठार झाला. शुक्रवारी दिनांक 14 मार्च रोजी दुपारी वणी-घुग्गुस रोडवर बेलोरा फाट्याजवळ ही घटना घडली. विवेक शर्मा (31) रा. घुग्गुस असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो वेकोलिच्या निलजई कोळसा खाणीत ओबी उत्खनन करणा-या कंपनीकडे व्हॉल्वो चालक म्हणून काम करीत होता. तो मुळचा परराज्यातील रहिवासी आहे. धुळवडीच्या दिवशी तो घुग्गुसवरून चारगाव चौकीच्या दिशेने त्याच्या दुचाकीने जात होता. दरम्यान नायगाव-बेलोरा जवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला धडकली. या अपघातात विवेकच्या डोक्याला गंभीर इजा झाला. रस्त्यावरील लोकांनी ऍम्बुलन्स बोलवून त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.