बसची म्हशीला धडक, बस कोसळली खाईत

0
216

जितेंद्र कोठारी, वणी: शहरालगत असलेल्या घोन्सा फाट्याजवळ एका बसने म्हशीला धडक दिली. आज संध्याकाळी पावने 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. धडक दिल्यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खाईत गेली. यात 7 जण जखमी झाले आहेत. जखमी हे साखरा गावातील रहिवासी असल्याची माहिती असून यातील सर्व जखमी सुखरूप आहे. 

दुपारी 5 वाजता वणीहून वणी-बोपापूर-वणी ही बस आहे. संध्याकाळी 6 वाजता ही बस बोपापूरहून वणीसाठी निघते. आज शनिवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता बोपापूरहून वणीसाठी बस (MH40N 8020) निघाली. पावने 7 वाजताच्या दरम्यान वणी नजिक घोन्सा फाट्याजवळील साईलीला नगरी जवळ अचानक बस समोर एक म्हैस आडवी आली. त्यामुळे भरधाव बसची म्हशीला धडक बसली. 

या धडकेनंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या कडेला असलेल्या उतारात गेली. या अपघातात बस चालक व वाहक सह साखरा गावातील 4 महिला आणि 2 पुरुष जखमी झाले. तर म्हशीचा जागीच मृत्यू झाला. जखमींना त्वरित वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींवर ग्रामीण रुग्णालयात डॉ. भालचंद्र आवारी यांनी उपचार केले. अपघातातील जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती त्यांनी दिली. सुदैवाने येताना बसमध्ये प्रवासी कमी असल्याने अनर्थ टळला. 

Relief Physiotherapy clinic
Previous articleद बर्निंग कार ….आणि अचानक धावत्या कारने घेतला पेट….
Next articleपाणी वाटप करणा-या गाडीने एकाला उडवले
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी 2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Loading...