रुग्णवाहिकेची ट्रकला धडक, 3 जखमी

वणीच्या पिदूरकर कुटूंबियांचा नागपूर मार्गावर अपघात

0 2,507

विलास ताजने, वणी : वणी येथून रुग्ण घेऊन नागपूरला उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णवाहिकेची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून अपघात झाल्याची घटना दि. ९ मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान जामच्या पुढे घडली. यात दोघे गंभीर जखमी झाले. तर एक जण किरकोळ जखमी झाला.

वणी येथील सेवानिवृत्त शिक्षक कृष्णा पिदूरकर हे घरी पडल्यामुळे त्यांचा हात मोडला. त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिका क्र. एम. एच. ३१ सी. बी. ३१०४ ने मंगळवारी रात्री नागपूरला हलविण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी, मुलगा नरेश आणि महेश हे रुग्णवाहिकेत होते. जामच्या पुढे वाहकाचे नियंत्रण सुटून रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला नादुरुस्त ट्रक क्र. ए.पी. ३९ डब्लू २१६७ ला मागच्या बाजूला धडकली.

यात कृष्णा पिदूरकर, नरेश पिदूरकर हे गंभीर जखमी झाले. तर महेश पिदूरकर किरकोळ जखमी झाला. पिदूरकर यांचे वणी येथे चिखलगाव मार्गावर जैताई मेडिकल स्टोअर आहे. अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Comments
Loading...