कामाहून परत येणा-या तरुणावर काळाचा घाला

मांगरुळ जवळ अपघात, वणीतील तरुणाचा जागीच मृत्यू

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथे काम संपवून घरी परतणा-या वणी येथील तरुणाच्या मोटारसायकलला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. मांगरुळ जवळ ही घटना घडली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री 8 ते सव्वा 8 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

Podar School 2025

मनोज सुभाष गायकवाड (35) हा तरुण वणीतील विठ्ठलवाडी परिसरात राहायचा. मनोजचा मारेगाव येथे धान्याची खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. व्यवसायानिमित्त मनोज रोज सकाळी वणीहून मारेगावला यायचा व संध्याकाळी काम संपल्यावर परत जायचा. बुधवारी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी रात्री 8 च्या सुमारास मनोज काम संपवून पॅशन प्रो या मोटारसायकलने (MH32 U1668) वणीला परत येत होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रात्री सव्वा 8 वाजताच्या सुमारास मांगरुळ जवळील विमल पाईप इंडस्ट्रिज मनोजच्या गाडीला एका अज्ञात वाहनाने समोरासमोर धडक दिली. हा अपघात इतका जबर होता की यात मनोज जागीच ठार झाला. रस्त्याने वाहतून करणा-या लोकांना मनोजचा अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी याची माहिती तातडीने मारेगाव पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना मनोजचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी मारेगाव पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे.

सुस्वभावी आणि सर्वांशी नम्रतापूर्वक व्यवहार असलेल्या मनोजच्या अचानक मृत्यूने वणीसह मारेगावातही शोककळा पसरली आहे. आज गुरुवारी दुपारी 1 वाजता मनोजवर शोकाकूल वातावरणात वणीतील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोजच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.

हे देखील वाचा:

एकीकडे नातीचे नामकरण तर दुसरीकडे आजोबाची आत्महत्या

भंगार चोरी प्रकरणी आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

Leave A Reply

Your email address will not be published.